-
अळशी हे आरोग्यासाठी उत्कृष्ट सुपरफूड मानले जाते. यामध्ये असलेले गुणधर्म शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. या बियांमध्ये भरपूर फायबर, ओमेगा-३ फॅटी ॲसिड, आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.
-
एक चमचा अळशीमध्ये सुमारे 1.8 ग्रॅम ओमेगा 3 आणि लिग्नान अँटीऑक्सिडंट असतात जे रोगप्रतिकारशक्ती आणि पचनशक्ती वाढवतात. अळशीचे योग्य प्रकारे सेवन केल्याने त्याचे आरोग्य फायदे आणखी वाढतात.
-
मधुमेहाचा त्रास असल्यास रोज रात्री आहारात अळशीच्या बियांचा समावेश करावा. वास्तविक, त्यात आहारातील फायबरचे प्रमाण चांगले असते जे शुगर स्पाइक रोखण्यास आणि नियंत्रित करण्यास देखील मदत करते.
-
पटकन वजन कमी करायचे असल्यास रोज रात्री झोपण्यापूर्वी अळशीचे पाणी प्यावे. यामुळे पोटासह तुमच्या संपूर्ण शरीराची चरबी कमी होण्यास मदत होईल.
-
अळशीच्या बियांमध्ये असलेले ओमेगा ३ फॅटी ॲसिड्स कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. शरीरातील वाढलेले कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यासाठी अळशीच्या बियांचे पाणी पिणे खूप फायदेशीर ठरू शकते.
-
अळशीमध्ये असलेले फायबर, लिग्नॅन्स आणि ओमेगा 3 आतड्यांतील जळजळ कमी करण्यास, चांगले बॅक्टेरिया वाढवण्यास आणि पोटाशी संबंधित अनेक समस्यांपासून संरक्षण करण्यास मदत करतात. बद्धकोष्ठता, अपचन, गॅस इत्यादी समस्या असल्यास अळशीच्या मदतीने आराम मिळू शकतो.
-
रोज रात्री अळशीच्या बियांचे पाणी प्यायल्यास त्वचा नैसर्गिकरित्या चमकण्यास मदत होते. यामध्ये असलेले अल्फा लिनोलेनिक ॲसिड आणि अँटिऑक्सिडंट्स मुरुम, त्वचेची ॲलर्जी, डाग आणि सुरकुत्या रोखतात. तसेच, त्वचा चमकदार आणि निरोगी बनवतात.
-
जर तुम्ही केसांशी संबंधित समस्यांनी त्रस्त असाल तर रोज तुमच्या आहारात अळशीच्या बियांचा समावेश करावा. यामध्ये असलेले व्हिटॅमिन बी, ई, ओमेगा ३ फॅटी ॲसिड, अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म केसांच्या समस्या दूर करण्यास मदत करतात.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा. (All Photos: Freepik)
Daily Health Tips: पोटाचा वाढलेला घेर झटपट कमी करायचा आहे? ‘या’ बियांच्या सेवनाने अनेक आरोग्य समस्या होतील दूर
रात्री फक्त ‘या’ बिया भिजवलेले पाणी प्यायल्यास काहीच काळात पोटाची चरबी आणि अनेक आरोग्य समस्या कमी होऊ शकतात.
Web Title: Daily health tips want to lose belly fat quickly consuming these seeds will cure many health problems pvp