Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. benefits of not showering everyday daily shower hygiene this is what happens to the body when you stop taking a shower sjr

रोज आंघोळ करण्याची सवय बंद केल्यास शरीरावर काय परिणाम होईल? डॉक्टरांनी दिले धक्कादायक उत्तर वाचाच

Daily Shower Hygiene : रोज अंघोळ न करण्याची शरीरावर काय दुष्परिणाम दिसू येतील.

Updated: August 5, 2024 07:59 IST
Follow Us
  • Benefits of not showering everyday daily shower hygiene this is what happens to the body when you stop taking a shower
    1/12

    वैयक्तिक स्वच्छतेसाठी अंघोळ ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. अनेक जण रोज सकाळी उठल्यानंतर दात घासून अंघोळ करतात. भारतात तरी याच पद्धतीचे लोक अनुसरण करतात.

  • 2/12

    कारण- अंघोळीमुळे शरीराची स्वच्छता तर राखता येतेच; शिवाय ताजेतवाने झाल्यासारखे वाटते, दिवसभर काम करताना एक उत्साह येतो.

  • 3/12

    पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, रोज अंघोळ करण्याची सवय तुम्ही अचानक बंद केली, तर त्याचा काय परिणाम होईल? अनेकांना या विचारानेच किळस वाटली असेल.

  • 4/12

    शरीराच्या नैसर्गिक प्रक्रिया समजून घेण्यासाठी ही गोष्ट महत्त्वाची आहे; पण अनेकांना हा विचारच मुळात आवडला नसेल. नियमित अंघोळ न केल्यास शरीरात होणारे बदल आणि त्वचेवरील जटिल परिसंस्थेबद्दल अधिक जाणून घेता येऊ शकते.

  • 5/12

    याच विषयावर बोअरिंग आणि लेडी कर्झन हॉस्पिटलच्या सहायक प्राध्यापिका डॉ. स्वेता श्रीधर यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे.

  • 6/12

    अंघोळ करण्याची सवय अचानक बंद केल्यास त्याचा शरीरावर कसा परिणाम होतो याविषयी त्यांनी सांगितले आहे.

  • 7/12

    डॉ. श्रीधर यांच्या मते, मानवी त्वचा ही नैसर्गिक तेल, घाम व मृत त्वचेच्या पेशी यांनी भरलेली एक गतिशील परिसंस्था आहे. त्यामुळे नियमित अंघोळ केल्याने यात संतुलन राखण्यास मदत होते.

  • 8/12

    परंतु, जेव्हा तुम्ही अचानक अंघोळीची सवय बंद करता तेव्हा हे टाकाऊ पदार्थ त्वचेवर जमा होतात.

  • 9/12

    तेल आणि घामामुळे समस्या : सेबम (त्वचेवरील तेल) आणि घामाचे जास्त उत्पादन त्वचेवरील छिद्रे बंद करू शकते. त्यामुळे मुरमे, ब्लॅकहेड्स आणि त्वचा तेलकट, चिकट होणे अशा समस्या वाढू शकतात.

  • 10/12

    मृत त्वचापेशींचा संचय : आपल्या त्वचेतील मृत त्वचापेशी हळूहळू निघून जात असतात. परंतु, नियमितपणे अंघोळ न केल्यास ही मृत त्वचा शरीरावर चिकटून राहील आणि त्यामुळे त्वचा निस्तेज, खडबडीत व फिकी दिसू शकते.

  • 11/12

    पीएच असंतुलन : त्वचेतील नैसर्गिक पीएच किंचित अम्लीय असते, जे हानिकारक जीवाणूंपासून संरक्षण करण्यास मदत करते. अंघोळ न केल्याने हे पीएच संतुलन बिघडू शकते; ज्यामुळे तुमची त्वचा संक्रमित होण्याची शक्यता अधिक असते.

  • 12/12

    खाज आणि जळजळ : घाम, घाण व मृत त्वचेच्या पेशी जमा झाल्यामुळे खाज सुटणे आणि जळजळ होऊ शकते. विशेषत: काखा आणि मांड्या यांसारख्या अवयवांना त्रास होऊ शकतो. (Photos Credit – Freepik)

TOPICS
मराठी बातम्याMarathi Newsमुंबई न्यूजMumbai Newsलाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Benefits of not showering everyday daily shower hygiene this is what happens to the body when you stop taking a shower sjr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.