Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. sleeping with ac on overnight know what happens to the body when you do that every day srk

रात्रभर एसी लावून झोपल्यावर शरीरावर काय परिणाम होतात? डॉक्टरांनी सांगितल्या आरोग्याच्या गंभीर समस्या

Health news: रात्रभर एसी चालू ठेवून झोपल्याने तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दिल्लीच्या सी. के.बिर्ला हॉस्पिटलच्या डायरेक्टर डॉ. मनीषा अरोरा यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.

August 6, 2024 19:17 IST
Follow Us
  • sleeping with ac on overnight know what happens to the body
    1/9

    उन्हाळा सुरू होताच बहुतेक लोक त्यांचे एसी सुरू करतात. कडक ऊन सुरू झाले की, अनेकांच्या घरात दिवसभर आणि रात्रभर एसी सुरू असतात. मात्र, काही घरांमध्ये १२ महिने एसी सुरू असतो, तर अनेक जण रात्री एसी सुरू ठेवूनच झोपून जातात (Photo: Freepik)

  • 2/9

    रात्रभर एसी चालू ठेवून झोपल्याने तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दिल्लीच्या सी. के.बिर्ला हॉस्पिटलच्या डायरेक्टर डॉ. मनीषा अरोरा यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.(Photo: Freepik)

  • 3/9

    डॉ. मनीषा अरोरा यांच्या मते, एसीमध्ये झोपल्याने तुमच्या शरीरावर अनेक परिणाम होऊ शकतात. जेव्हा तुम्ही एसीमध्ये झोपता तेव्हा खोलीचे तापमान रात्री इतके कमी होते की, तुमच्या शरीराला अस्वस्थ वाटू शकते. अधिक काळ एसी लावून झोपल्यामुळे डोकेदुखी आणि पाठदुखीची समस्या जाणवते. (Photo: Freepik)

  • 4/9

    एसीमुळे निर्माण होणारी थंड हवा त्वचेतील ओलावा काढून टाकू शकते, ज्यामुळे कोरडेपणा येतो. कमी आर्द्रता आणि प्रसारित हवेमुळे श्वासोच्छ्वासाच्या समस्यांचा धोका वाढतो. त्याशिवाय एअर कंडिशनरमुळे पर्यावरणाची हानी होते. (Photo: Freepik)

  • 5/9

    डॉ. अरोरा म्हणाल्या, “एसीमुळे दमा, सीओपीडी व ब्राँकायटिस यांसारख्या श्वसनाच्या समस्यादेखील वाढू शकतात. संधिवाताच्या रुग्णांमध्ये यामुळे स्नायू कडक होणे आणि सांधेदुखी यांसारखे त्रास बळावू शकतात. (Photo: Freepik)

  • 6/9

    त्याव्यतिरिक्त एसी युनिट नियमितपणे साफ न केल्यास एसीमधली धूळ आणि बुरशीमुळे संवेदनशील व्यक्तींची अॅलर्जी वाढू शकते. सर्वसाधारण व्यक्तींच्या बाबतीत संक्रमण आणि अॅलर्जीचा धोका वाढू शकतो. (Photo: Freepik)

  • 7/9

    रात्रभर एसीमध्ये झोपल्यानंतर सकाळी एखाद्याला जडपणा, डोकेदुखी, मळमळ व थकवा जाणवू शकतो.” पुढे डॉ. अरोरा यांनी स्पष्ट केले की, हे कधी कधी हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या समस्या वाढवू शकते; विशेषत: वृद्ध लोकांमध्ये किंवा लहान मुलांमध्ये.(Photo: Freepik)

  • 8/9

    एसी असलेल्या खोलीत घालवलेला वेळ मर्यादित करण्याची शिफारस केली जाते. तापमान खूप जास्त नसून मध्यम पातळीवर ठेवावे, असे डॉ. अरोरा म्हणाले. (Photo: Freepik)

  • 9/9

    एसी असलेल्या खोलीत दोन ते तीन तास घालवणे पुरेसे आहे. रात्री तुम्ही दोन ते तीन तासांनंतर एसी स्वयंचलितपणे बंद होण्यासाठी सेट करू शकता. २२ ते २६ अंश सेल्सिअससारखे आरामदायक तापमान राखले पाहिजे. एसीमध्ये HEPA फिल्टर वापरल्याने धूळ आणि अॅलर्जी कमी होण्यास मदत होऊ शकते.(Photo: Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Sleeping with ac on overnight know what happens to the body when you do that every day srk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.