-
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये डेंग्यू हा आजार मोठ्या प्रमाणावर फैलावतो. अशा परिस्थितीत काही फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश केल्यास आजार बरा होण्यास मदत होऊ शकते.
-
तुम्ही आजारी असताना तुमची प्रतिकारशक्ती टिकवून ठेवण्यासाठी किवीमधील आवश्यक पोषकतत्त्वे मदत करू शकतात.
-
शरीराला व्हिटॅमिन सीचा चांगला पुरवठा होण्यासाठी किवीचे सेवन सुरू करावे.
-
डाळिंबात खनिजे आणि पोषक तत्वे जास्त असतात. ते शरीरातील प्लेटलेटची संख्या वाढवण्यास मदत करू शकते.
-
डेंग्यू तापामुळे अनेकदा डिहायड्रेशन होते. नारळाच्या पाण्यात इलेक्ट्रोलाइट्स भरपूर प्रमाणात असतात आणि ते महत्त्वाचे पोषक घटक पुरवतात.
-
ब्रोकोली व्हिटॅमिन के चा एक चांगला स्रोत आहे, ज्यामुळे प्लेटलेटची पातळी सुधारू शकते.
-
लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी बीटरूट फायदेशीर आहे. यामध्ये डिटॉक्सिफायिंग गुणधर्म असतात जे शरीरासाठी उत्तम असतात.
-
पालकमध्ये व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात असते. लोहाचा समृद्ध स्रोत, पालक रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करू शकते.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. (All Photos: Freepik)
डेंग्यू झालेल्या रुग्णाचा आहार कसा असावा? तज्ज्ञांनी सांगितलेले ‘हे’ पदार्थ ठरू शकतात गुणकारी
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये डेंग्यू हा आजार मोठ्या प्रमाणावर फैलावतो. अशा परिस्थितीत काही फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश केल्यास आजार बरा होण्यास मदत होऊ शकते.
Web Title: Health tips what should be the diet of dengue patient experts say these healthy food can be effective pvp