• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. healthy seeds what is the right chia seeds or sabja in the diet know the health benefits of these seeds arg

Healthy Seeds: आहारात ‘चिया सीड्स’ की ‘सब्जा’ काय आहे योग्य? जाणून घ्या या बियांचे आरोग्यदायी फायदे

सब्जा आणि चिया या दोन्ही बिया अनेक आरोग्य फायद्यांसाठी ओळखले जातात. या बियांचे सेवन केल्याने आरोग्य समस्या दूर होऊन शरीर निरोगी राहते.

August 25, 2024 21:58 IST
Follow Us
  • Sabja Seeds vs Chia Seeds
    1/12

    निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्यासाठी सुपरफूडचा वापर वाढत चालला आहे आणि या खाद्यपदार्थांच्या यादीत सब्जा बिया आणि चिया बिया प्रमुख आहेत. सब्जा बिया आणि चिया बिया दोन्ही सुपरफूड म्हणून ओळखले जातात.

  • 2/12

    दोन्ही बियांमध्ये मुबलक प्रमाणात पोषक तत्व असतात जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात. हे खाल्ल्याने अनेक आजार दूर होतात आणि अनेक आजार बरे देखील होतात.

  • 3/12

    सब्जा बिया भारतात खूप प्रसिद्ध आहेत परंतु अलीकडच्या काळात चिया बिया देखील अनेक आरोग्य समस्यांसाठी उपयुक्त ठरल्या आहेत. सब्जाच्या बिया दिसायला लहान, काळ्या आणि कुरकुरीत असतात. तर चिया बिया लहान आणि दिसायला अगदी गुळगुळीत असतात.

  • 4/12

    सब्जाच्या बिया गोड तुळशीच्या वनस्पतीपासून मिळतात, जी सामान्यतः भारतात आढळते. तर चिया बिया हे साल्व्हिया हिस्पॅनिका वनस्पतीच्या बिया आहेत, जे मेक्सिकोमध्ये आढळतात.

  • 5/12

    अनेकदा या दोन बियांमधला फरक कळात नाही. सब्जाच्या बिया काळ्या, लहान आणि गोल असतात. चिया बिया आकाराने किंचित मोठ्या, राखाडी, पांढरा आणि काळा यासह विविध रंगांमध्ये येतात.

  • 6/12

    सब्जाच्या बिया सामान्यतः फालुदा, शरबत या खाद्यपदार्थांमध्ये वापरल्या जातात. तर चिया बिया स्मूदी, पुडिंग्स, ओटमीलसाठी वापरतात.

  • 7/12

    दोन्ही बियांमध्ये फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, ओमेगा-३ फॅटी ऍसिडस् आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.

  • 8/12

    सब्जाच्या बिया खूप लवकर पाणी शोषतात तर चिया बिया पाणी शोषण्यास वेळ घेतात आणि रात्रभरात ते त्यांच्या आकाराच्या १० पट जास्त फुगतात.

  • 9/12

    उन्हाळ्याच्या काळात या बियांचा शरीरावर थंड प्रभाव पडतो आणि शरीरातील उष्णता कमी होण्यास आणि सूर्यप्रकाशामुळे होणाऱ्या नुकसानापासून शरीराचे संरक्षण करण्यात मदत होते.

  • 10/12

    आरोग्याच्या फायद्यांबद्दल सांगायचे झाले तर, सब्जाच्या बिया हाडांचे आरोग्य आणि स्नायू मजबूत करण्यास मदत करू शकतात. यासोबतच शरीरातील कार्बोहायड्रेट्सचे शोषण मंद करून रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास फायदेशीर ठरते.

  • 11/12

    चिया बिया हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी आणि शरीरातील जळजळ कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असल्याने हे पचन क्रिया देखील सुधारते.

  • 12/12

    आरोग्य सुधारण्यासाठी तुम्ही तुमच्या गरजेनुसार सब्जा किंवा चिया बिया वापरू शकता. (फोटो स्त्रोत: पेक्सेल्स आणि फ्रीपिक)

TOPICS
मराठी बातम्याMarathi Newsहेल्थHealthहेल्थ टिप्सHealth Tips

Web Title: Healthy seeds what is the right chia seeds or sabja in the diet know the health benefits of these seeds arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.