-

तासनतास बसून राहिल्यामुळे किंवा झोपण्याच्या चुकीच्या शैलीमुळेही पाठदुखी होऊ शकते.
-
याकडे दुर्लक्ष केल्याने हा त्रास वाढू शकतो यासाठी येथे काही सोपे उपाय आहेत, ज्यांच्या मदतीने तुम्हाला आराम मिळू शकतो.
-
तुम्ही तुमच्या शरीराला जितकं जास्त सक्रिय ठेवाल तितके तुम्ही या समस्येपासून मुक्त राहू शकता.
-
या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही कोल्ड थेरपी घेऊ शकता. यासाठी तुम्ही कोमट पाण्याने आंघोळ करू शकता किंवा होत वॉटर बॅग दुखणाऱ्या भागावर लावू शकता. तुम्ही यासाठी बर्फ देखील वापरू शकता.
-
पाठदुखीवर मसाजही प्रभावी असतो. पाठदुखीपासून आराम मिळवण्यासाठी अनेक मसाज तंत्रे आहेत. यामध्ये ट्रिगर पॉइंटवर दाब मिळावल्यावर स्नायू शिथिल होतात.
-
जर पाठदुखी गंभीर असेल तर तुम्ही ॲक्युपंक्चरचीही मदत घेऊ शकता. ही एक पारंपारिक वैद्यकीय पद्धत आहे ज्यामध्ये वेदना कमी करण्यासाठी लहान सुया वापरल्या जातात.
-
व्यायाम आणि स्ट्रेच केल्यानेही पाठदुखीपासून आराम मिळू शकतो.
-
योगामुळे पाठदुखीपासून आराम मिळू शकतो. कोब्रा पोजमुळे पाठदुखीच्या समस्येपासून आराम मिळतो. हे नियमितपणे केल्यास शरीराला अनेक फायदे देखील होतात.
-
आधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या. (सर्व फोटो: फ्रीपीक)
Backpain: ॲक्युपंक्चर ते कोल्ड थेरपी जाणून घ्या पाठदुखीची समस्या कमी करण्यासाठी ‘या’ सोप्या पद्धती
पाठदुखी ही एक सामान्य समस्या आहे जी बराच वेळ बसून राहिल्याने किंवा जड वस्तू उचलल्यामुळे उद्भवू शकते. पाठदुखीपासून आराम मिळवण्यासाठी जाणून घ्या काही सोपे उपाय.
Web Title: Backpain from acupuncture to cold therapy learn these simple ways to ease back pain arg 02