-
Kitchen Jugaad Video: पालक पनीर, मटार पनीर, पनीर पुलाव, पनीर टिक्का… एक ना दोन पनीरपासून असे कितीतरी पदार्थ पनीरपासून बनवतात येतात. पनीरचा वापर काही वेळा थेट किंवा काही वेळा थोडे फ्राय करून केला जातो. (फोटो: @Didi_ye_kaise_kru यु्ट्युब व्हिडीओ ग्रॅब)
-
पण तुम्ही कधी पनीरमध्ये टुथपेस्ट टाकून वापरून पाहिला आहे का? एका गृहिणीने हा जुगाड दाखवला हे. या हटके जुगाडाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. (फोटो: @Didi_ye_kaise_kru यु्ट्युब व्हिडीओ ग्रॅब)
-
आता तुम्ही म्हणाल पनीरमध्ये टथपेस्ट कोण टाकतं? चला जाणून घेऊयात तुम्हाला नक्की काय करायचंय…तुम्हाला करायचं काय आहे, तर कोणताही पदार्थ बनवण्यासाठी तुम्ही पनीर आणला की त्याचा छोटासा तुकडा कापून बाजूला ठेवा. (फोटो: @Didi_ye_kaise_kru यु्ट्युब व्हिडीओ ग्रॅब)
-
हा तुकडा किसणीवर किसून घ्या. आता यात एक चमचा गव्हाचं पीठ टाका. थोडासा लिंबूरस टाका. आता यात टुथपेस्ट टाका. चिमूटभर हळद टाकून हे मिश्रण हातानी मिक्स करा. (फोटो: @Didi_ye_kaise_kru यु्ट्युब व्हिडीओ ग्रॅब)
-
गृहिणी दिवसभर घरच्या कामात व्यस्त असतात. त्यांना स्वतःकडे लक्ष द्यायलाही वेळ नसतो. काम करून हात आणि पायांच्याही समस्या उद्भवतात. हातपाय काळे, कोरडे पडतात. (फोटो : Freepik)
-
अशावेळी हे मिश्रण तुम्हाला कामी येईल. हे मिश्रण तोंडाला लावू नका. तोंडाला लावायचं असेल तर यात टुथपेस्ट टाकू नका, असंसुद्धा या महिलेने व्हिडीओत सांगितलं आहे. (फोटो: @Didi_ye_kaise_kru यु्ट्युब व्हिडीओ ग्रॅब)
-
गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतात, ज्यामुळे आपली बरीच डोंगराएवढी मोठी वाटणारी कामं कधी कधी किचनमधल्याच वस्तूंनी चुटकीशीर होऊन जातात. (फोटो: @Didi_ye_kaise_kru यु्ट्युब व्हिडीओ ग्रॅब)
-
दरम्यान एका गृहिणीने खास महिलांसांठी आज असाच एक हटके आणि टेन्शन दूर करणारा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे. @Didi_ye_kaise_kru यूट्यूब अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. (फोटो: @Didi_ye_kaise_kru यु्ट्युब व्हिडीओ ग्रॅब)
-
तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा.(फोटो: @Didi_ye_kaise_kru यु्ट्युब व्हिडीओ ग्रॅब)
Kitchen Jugaad: महिलांनो पनीर वापरताना एकदा त्यात टुथपेस्ट नक्की टाका; विचित्र पण मोठ्या फायद्याचा
Kitchen hack: तुम्ही कधी पनीरमध्ये टुथपेस्ट टाकून वापरून पाहिला आहे का? एका गृहिणीने हा जुगाड दाखवला हे. या हटके जुगाडाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Web Title: Kitchen jugaad marathi toothpaste on paneer use for skin cleaning kitchen hacks in marathi srk