-
कडुनिंबाच्या पानांमध्ये विषाणूविरोधी गुणधर्म आढळतात, जे काही विषाणूंविरूद्ध प्रभावी असतात. कडुलिंबामध्ये बॅक्टेरिया विरोधी गुणधर्म आढळतात. यामुळे शरीरातील अनेक जखमा लवकर बऱ्या होतात. कडुलिंबाची पाने अँटिऑक्सिडेंट भरपूर असतात, यामुळे अनेक आरोग्य समस्या कमी होतात.
-
कडुलिंबाची पाने त्याच्या अँटीबैक्टीरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांमुळे मुरुमांची समस्या कमी करण्यास मदत करतात.
-
कडुलिंबाच्या पानांचा वापर दात किडणे, श्वासाची दुर्गंधी आणि हिरड्यांचे आजार रोखण्यासाठी देखील होऊ शकतो.
-
कडुलिंबाची पाने केसांमधील कोंडा कमी करतात ज्यामुळे केसांच्या निरोगी वाढीस चालना मिळते.
-
कडुलिंबाची पाने त्यांच्या विषाणूविरोधीही आणि तीव्र वासामुळे डास आणि इतर कीटकांना दूर करू शकतात.
-
तुम्ही कडुनिंबाची पाने संसर्ग कमी करण्यासाठी देखील वापरू शकता. कडुलिंबाची पाने अँटीबैक्टीरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी असतात, त्यामुळे या पानांची पेस्ट बनवून तुम्ही ते वापरू शकता.
-
सिल्क आणि कॉटनचे कपडे ठेवताना त्यात कडुलिंबाची पाने टाका. हे बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करतात यामुळे कपड्यांना कीटकांचा संसर्ग होत नाही.
-
अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.
-
(सर्व फोटो: फ्रीपीक)
Neem Leaves: मुरुमांपासून ते केसांच्या ‘या’ समस्यांवर कडुलिंबाची पाने ठरू शकतात उपयुक्त; जाणून घ्या यासाठी सोप्या घरगुती पद्धती
चेहऱ्यावर होणाऱ्या मुरुमांपासून ते केसांच्या अनेक समस्यांसाठी तुम्ही कडुनिंबाच्या पानांचा वापर करू शकता.
Web Title: From acne to hair problems neem leaves can be helpful learn simple home remedies for this arg 02