• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. consume this food on an empty stomach to detoxify body many diseases will be removed by increasing the immune system arg

शरीराला डिटॉक्स करण्यासाठी दररोज रिकाम्या पोटी करा ‘या’ पदार्थाचे सेवन; रोगप्रतिकारक शक्ती वाढून अनेक आजार होतील दूर

दररोज रिकाम्या पोटी काही पदार्थाचे सेवन केल्याने तुमच्या शरीराला अनेक आरोग्य फायदे मिळू शकतात.

September 3, 2024 20:10 IST
Follow Us
  • Benefits of Amla
    1/12

    आवळा अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, फ्लेव्होनॉइड्स आणि अँथोसायनिन सारखे पोषक घटक आढळतात. रोज एक आवळा रिकाम्या पोटी खाल्ल्याने तुमच्या शरीराला अनेक आरोग्य फायदे मिळू शकतात.

  • 2/12

    आवळा व्हिटॅमिन सी मध्ये समृद्ध आहे, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि शरीराला अनेक संक्रमण आणि रोगांशी लढण्यास मदत करते. याच्या सेवनाने सर्दी-खोकला यांसारख्या मौसमी आजारांपासूनही बचाव होतो.

  • 3/12

    आवळा पचनक्रिया सुधारून बद्धकोष्ठता, ऍसिडिटी आणि गॅस्ट्रिक या समस्या दूर करण्यास प्रभावी ठरतो.

  • 4/12

    आवळ्यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी शरीरात कोलेजनच्या उत्पादनास प्रोत्साहन देतात. हे त्वचा चमकदार आणि निरोगी ठेवते आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासही मदत करते.

  • 5/12

    आवळ्याचे नियमित सेवन केल्याने केसांचे आरोग्य सुधारते. यामधील लोह आणि कॅरोटीनचे प्रमाण केस गळणे कमी करते, आणि केस मजबूत आणि दाट बनवते.

  • 6/12

    आवळा कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. तसेच हे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासही मदत करते.

  • 7/12

    आवळा कॅलरीजमध्ये कमी असल्यामुळे भूक नियंत्रित राहते आणि वजन कमी करण्यास मदत करते.

  • 8/12

    आवळ्यामध्ये असलेले कॅरोटीन डोळ्यांचे आरोग्य सुधारते आणि मोतीबिंदूसह डोळ्यांच्या इतर समस्या कमी करण्यास मदत करते.

  • 9/12

    आवळा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.

  • 10/12

    आवळ्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरीज आढळतात, ज्यामुळे संधिवात आणि इतर विकारांपासून आराम देण्यासाठी मदत होते.

  • 11/12

    आवळा शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतो. शरीराचे नैसर्गिक डिटॉक्सिफिकेशन आणि चांगले आरोग्य राखण्यासाठी तुम्ही दररोज आवळ्याचे सेवन करू शकता.

  • 12/12

    अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या. (फोटो स्त्रोत: पेक्सेल्स आणि फ्रीपिक)

TOPICS
मराठी बातम्याMarathi Newsहेल्थ न्यूजHealth News

Web Title: Consume this food on an empty stomach to detoxify body many diseases will be removed by increasing the immune system arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.