• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. durva which is loved by ganapati bappa is also very beneficial for health how to include in the diet find out here pvp

गणपती बाप्पाला आवडणारा दुर्वा आरोग्यासाठीही अतिशय गुणकारी; कसा करावा आहारात समावेश? जाणून घ्या

गणपती बाप्पाला दुर्वा फार आवडत असल्याने भक्त त्याला दुर्वा अर्पण करतात. आज आपण दुर्वा सेवन केल्याने कोणते आरोग्यदायी फायदे मिळतात जाणून घेऊया.

September 5, 2024 11:23 IST
Follow Us
  • ganpati-special-durva-health-benefits
    1/10

    गणपती बाप्पाला दुर्वा फार आवडत असल्याने भक्त त्याला दुर्वा अर्पण करतात. पण, तुम्हाला माहीत आहे का की, दुर्वा आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहेत.

  • 2/10

    आहारात दुर्वांचा समावेश करून आपण अनेक समस्यांपासून आराम मिळवू शकतो . आज आपण दुर्वा सेवन केल्याने कोणते आरोग्यदायी फायदे मिळतात जाणून घेऊया.

  • 3/10

    दुर्वांमध्ये अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात. जे शरीराला अनेक आजारांपासून दूर ठेऊ शकतात, तसेच ते एक प्रतिजैविक म्हणून देखील वापरले जाते.

  • 4/10

    काही अभ्यासानुसार, मधुमेहाच्या रुग्णांनी दुर्वांचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

  • 5/10

    दुर्वांमध्ये प्रोटीन व्यतिरिक्त कॅल्शियम, फायबर, पोटॅशियम आणि कार्बोहायड्रेट्स आढळतात, त्यामुळे ते बद्धकोष्ठता तसेच पोटाच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त आहे.

  • 6/10

    जर तुम्ही डोकेदुखीच्या समस्येने त्रस्त असाल तर तुम्ही दुर्वांचे सेवन करू शकता, कारण हे डोकेदुखी दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. यासाठी दुर्वा आणि चुना समप्रमाणात बारीक करून हे मिश्रण कपाळावर लावा. असे केल्याने फायदा होऊ शकतो.

  • 7/10

    काही लोकांना नाकातून रक्त येण्याची समस्या उद्भवते. ही समस्या कधीकधी वेदनादायक असू शकते. यामुळे ही समस्या दूर करण्यातही दुर्वा तुमची मदत करू शकते. यासाठी डाळिंबाच्या फुलाचा रस दुर्वांमध्ये मिसळून पेस्ट तयार करा, त्यातील पाणी नाकात टाकल्यास नाकासाठी फायदा होऊ शकतो.

  • 8/10

    जर तुमच्या तोंडात फोड येत असतील तर तुम्ही दुर्वा वापरू शकता. दुर्वांच्या काढ्याने गुळण्यास तोंडाच्या फोडांपासून आराम मिळू शकतो.

  • 9/10

    ज्या लोकांना युरिन इन्फेक्शन आहे किंवा लघवीमध्ये रक्त येण्याची समस्या आहे, ते दुर्वा आणि दूध वापरू शकतात. याच्या मदतीने लघवीत जळजळ होण्याची समस्या तर दूर होतेच; पण घास, लघवी करताना होणाऱ्या वेदना, इन्फेक्शन आदी समस्यांपासूनही आराम मिळू शकतो.

  • 10/10

    येथे देण्यात आलेली माहिती गृहितके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. (Photos: Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Durva which is loved by ganapati bappa is also very beneficial for health how to include in the diet find out here pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.