-
आजकाल बिघडलेली जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या निर्माण होत आहेत, त्यातील एक प्रमुख समस्या म्हणजे युरिक ॲसिड. युरिक ऍसिडचे प्रमाण वाढल्याने संधिवात, किडनी समस्या आणि हृदयविकाराचा झटका यांसह अनेक धोकादायक आजार होऊ शकतात.
-
यासाठी भेंडीचे सेवन करताना काही विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, विशेषत: जर तुमच्या शरीरात यूरिक ऍसिडचे प्रमाण जास्त असेल. भेंडीचे सेवनाने हे आजार कसे वाढू शकतात ते जाणून घेऊया.
-
बरेच लोक जास्त तेल आणि मसाले घालून भिंडीची भाजी करतात. अशी जास्त मसालेदार आणि तेलकट भिंडी खाल्ल्याने युरिक ऍसिडचे प्रमाण वाढू शकते. यामुळे, सांध्यातील वेदना आणि सूज वाढण्याचा धोका असतो, ज्यामुळे पुढे संधिवात सारखे आजार होऊ शकतात.
-
अतिरिक्त यूरिक ऍसिड क्रिस्टल्सच्या रूपात शरीरात जमा होऊ शकते आणि सांध्याभोवती जमा होऊ शकते, ज्यामुळे सूज आणि वेदना वाढते. यामुळे संधिवात, किडनीचे आजार आणि हृदयविकाराचा झटका यासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.
-
भेंडी रात्रभर पाण्यात भिजवून ते पाणी प्यायल्याने युरिक ॲसिडची पातळी कमी होण्यास मदत होते. भेंडीमध्ये मॅग्नेशियम, फायबर, व्हिटॅमिन ए, सी, के आणि बी-६ सारखे अनेक पोषक घटक असतात, जे शरीरासाठी फायदेशीर असतात.
-
भेंडीमध्ये भरपूर पोषक तत्व असले तरी नियमित्त भेंडीचे सेवन यूरिक ऍसिड, किडनी किंवा हृदयाची समस्या वाढवू शकतात.
-
भेंडीचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने पचनाच्या समस्या देखील उद्भवू शकतात.
-
अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.
-
(फोटो स्त्रोत: पेक्सेल्स)
Healthy Living: हृदयविकारापासून ते संधिवात अशा आजारांचा धोका कमी करण्यासाठी आहारात टाळा ‘या’ पदार्थाचे सेवन
जर तुम्हाला संधिवात, किडनी किंवा हृदयाची समस्या असेल तर तुम्ही काही पदार्थांचे सेवन संतुलित प्रमाणात आणि योग्य पद्धतीने केले पाहिजे.
Web Title: Healthy living avoid these foods in your diet to reduce your risk of diseases ranging from heart disease to arthritis arg 02