-
ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या राशी परिवर्तनाला खूप महत्त्वपूर्ण मानले जाते; ज्याचा प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
२०२४ मध्ये शनी, बुध, गुरू व मंगळ हे चारही ग्रह वक्री होतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सध्या बुध आणि शनि ग्रह वक्री अवस्थेत असून, २०२४ च्या शेवटी ऊर्जा आणि आत्मविश्वासाचा कारक ग्रह मंगळ कर्क राशीमध्ये वक्री होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
पंचांगानुसार मंगळ ग्रह ७ डिसेंबर २०२४ रोजी ५ वाजून १ मिनिटापासून वक्री होईल आणि २४ फेब्रुवारी २०२५ पर्यंत तो या राशीत वक्री राहील; ज्याचा शुभ किंवा अशुभ परिणाम काही राशींच्या व्यक्तींवर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मेष राशीच्या व्यक्तींसाठी मंगळ ग्रहाचे राशी परिवर्तन खूप शुभ परिणाम देणारे ठरेल. या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. नोकरीमध्ये पदोन्नत्तीसह बदली होण्याची दाट शक्यता आहे. मालमत्तेसंबंधीचे वाद मिटतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी मंगळ ग्रहाचे राशी परिवर्तन खूप सकारात्मक सिद्ध होईल. या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. कुटुंबातील वरिष्ठांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. धार्मिक तीर्थक्षेत्रांना भेटी द्याल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मंगळ ग्रहाचे राशी परिवर्तन कन्या राशीच्या व्यक्तींसाठी भाग्यकारी ठरेल. या काळात तुम्हाला उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. या काळात फक्त कोणताही निर्णय विचार करून घ्या.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
२०२४ च्या शेवटपर्यंत मंगळ करणार मालामाल; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींवर असणार देवी लक्ष्मीची कृपा
Mangal rashi parivartan 2024: पंचांगानुसार मंगळ ग्रह ७ डिसेंबर २०२४ रोजी ५ वाजून १ मिनिटापासून वक्री होईल आणि २४ फेब्रुवारी २०२५ पर्यंत तो या राशीत वक्री राहील.
Web Title: By end of 24 mars will give money and happy life of these three zodiac signs sap