-
Diabetes Health tips: आपल्या चांगल्या आरोग्यासाठी सुरू केलेली औषधे घेण्याचे महत्त्व आपल्या सर्वांना माहीत आहे. पण, जेव्हा आपल्याला औषधे घेतल्यावर काही दिवसांनी बरे वाटते तेव्हा आपण ते औषध घेणे बंद करतो. (Photo: Freepik)
-
मात्र, आपल्याला सुरू असलेली औषधे अचानक बंद केल्यानं शरीरावर काय परिणाम होतो हे तुम्हाला माहिती आहे का? खास करून डायबिटीज असलेले रुग्ण डायबिटीजची औषधे जेव्हा अचानक बंद करतात, तेव्हा शरीरावर काय परिणाम होतो हे जाणून घेऊयात. (Photo: Freepik)
-
द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना खार येथील हिंदुजा हॉस्पिटल आणि एमआरसी, सल्लागार, मधुमेहशास्त्र, पी. डी. डॉ. मनोज चावला यांनी यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.(Photo: Freepik)
-
औषधांमध्ये हलगर्जीपणा केल्यास रक्तातील साखरेच्या पातळीवर गंभीर परिणाम होऊ शकतात, त्यामुळे डायबिटीज रुग्णांना रोजच्या रोज औषधे घेणे गरजेचे आहे, असे डॉ. मनोज चावला सांगतात.(Photo: Freepik)
-
डायबिटीजसारख्या परिस्थितींमध्ये अचानक औषधोपचार थांबल्यामुळे संक्रमणाचा धोका वाढू शकतो आणि डायबेटिक केटोॲसिडोसिससारख्या तीव्र गुंतागूंत होण्याची शक्यता असते, जी रक्तातील ॲसिड तयार होण्याद्वारे दर्शविलेली जीवघेणी स्थिती असू शकते.(Photo: Freepik)
-
शिवाय हृदयविकाराच्या झटक्यासारख्या तीव्र वैद्यकीय घटनांचा धोका लक्षणीय वाढतो. “या संभाव्य धोकादायक परिणामांना रोखण्यासाठी सातत्यपूर्ण उपचारासह डायबिटीजचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.(Photo: Freepik)
-
तसेच तुमच्या औषधाच्या पद्धतीमध्ये कोणतेही बदल करण्यापूर्वी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, तसेच वेळेवर तपासणी करणे महत्त्वाचे आहे, असे डॉ. चावला सांगतात.(Photo: Freepik)
-
व्यायाम केल्याने शरीर सक्रिय राहते, यामुळे आपली चयापचय क्रियादेखील चांगली राहते. व्यायामामुळे आपल्या पेशींची इन्सुलिन संवेदनशीलतादेखील वाढते, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठीही व्यायाम करणे महत्त्वाचे आहे. दररोज ३० मिनिटे व्यायाम केला पाहिजे.(Photo: Freepik)
-
जास्त वजन हे मधुमेहाचे एक प्रमुख कारण आहे. तुमचे वजन जास्त असल्यास वजन कमी करण्याचा प्रयत्न करा, यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. त्यासाठी आहाराचे नियोजन करू शकता. यामुळे तुम्ही निरोगी राहाल आणि तुमचे वजनही कमी होईल.(Photo: Freepik)
डायबिटीजची औषधे घेणे अचानक बंद केल्यावर शरीरावर काय होईल? वाचा डॉक्टरांनी काय सांगितलं
डायबिटीजची औषधे घेणे अचानक बंद केल्यावर शरीरावर काय परिणाम होतो? मधुमेहशास्त्र, पी. डी. डॉ. मनोज चावला यांनी यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.
Web Title: What happens to the body when you suddenly stop taking diabetes medication take care in advance to avoid diabetes know more srk