-
ज्योतिषशास्त्रात शनि ग्रहाला खूप महत्त्वपूर्ण मानले जाते. शनिचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन खूप खास मानले जाते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शनि एका राशीत जवळपास अडीच वर्ष उपस्थित असतो. शनिला संपूर्ण राशीचक्र पूर्ण करण्यासाठी ३० वर्षांचा काळ लागतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सध्या शनि त्याची स्वराशी असलेल्या कुंभ राशीत विराजमान असून, २९ जूनपासून शनि याच राशीत वक्री झाला आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शनिची ही वक्री चाल काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप उत्तम असेल. शनिच्या या वक्री चालीने शश राजयोग निर्माण होत आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तसेच शनि १५ नोव्हेंबरपर्यंत वक्री राहील. या काळात काही राशींच्या व्यक्तींना अनेक शुभफळाची प्राप्ती होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा शनि आपली स्वराशी कुंभ किंवा मकरमध्ये असतो, तसेच त्याच्या उच्च तूळ राशीत असतो आणि कुंडलीच्या मध्यभागी असतो तेव्हा ‘शश राजयोग’ निर्माण होतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी शश राजयोग खूप अनुकूल सिद्ध होईल. आर्थिक, शारीरिक आणि मानसिक समस्या दूर होतील. वडिलोपार्जित संपत्तीत लाभ होतील. कर्ज कमी होईल. कामाच्या निमित्ताने दूरचे प्रवास करावे लागतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शश राजयोगाचा कुंभ राशीच्या व्यक्तींना चांगला फायदा होईल. आर्थिक समस्या दूर होतील. अडकलेले पैसे परत मिळतील. भाग्याची पूरेपूर साथ मिळेल. कष्टाचे गोड फळ मिळेल. जुने वाद मिटतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शश राजयोग वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप शुभ परिणामकारक ठरेल. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील, करिअरमध्ये हवे तसे यश मिळविता येईल. नव्या कामाची सुरुवात होईल. कामातील अडथळे दूर होतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
१५ नोव्हेंबरपर्यंत बक्कळ पैसा! शनि निर्माण करणार ‘शश राजयोग’; ‘या’ तीन राशींचे लोक होणार मालामाल
Shash Raja Yoga: शनिची ही वक्री चाल काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप उत्तम असेल. शनिच्या या वक्री चालीने शश राजयोग निर्माण होत आहे.
Web Title: Money earn till november 15th shani will create shash raja yoga of these three zodiac signs sap