-

काही पदार्थांचे सेवन केल्याने अनेक आरोग्य समस्यांपासून आराम मिळतो. ड्रायफ्रुट्सचे नियमित सेवन केल्यास हृदयविकारापासून ते मधुमेहापर्यंत अनेक गंभीर आजारांचा धोका कमी होतो. मात्र काही ड्राय फ्रुट्सचे सेवन आरोग्यासाठी त्रासदायी असू शकते, यासाठी जाणून घेऊया एका पर्यायाबाबत.
-
शेंगदाण्याचे सेवन केल्याने अनेक आरोग्य समस्या दूर होतात.
-
शेंगदाण्यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन बी-६, खनिजे, पोषक आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.
-
शेंगदाण्यात फॅटी ऍसिड आढळतात जे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करून चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवण्यास मदत करतात.
-
शेंगदाण्यामध्ये फायबर आणि प्रथिने चांगल्या प्रमाणात आढळतात, याच्या सेवनाने वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.
-
यासोबतच शेंगदाणे कॅन्सरवरही खूप गुणकारी आहेत. यामधील पॉलीफेनॉलिक अँटीऑक्सिडंट कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत.
-
शेंगदाण्यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, मँगनीज आणि कार्बोहायड्रेट्स देखील भरपूर प्रमाणात असतात आणि हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
-
एवढेच नाही तर शेंगदाण्यात असे अनेक पोषक तत्व आढळतात जे शरीराला आतून डिटॉक्स करण्यास मदत करतात ज्यामुळे त्वचेशी संबंधित समस्या दूर होतात.
-
शेंगदाण्याचे सेवन केल्याने शरीराला आतून पोषण मिळते त्यामुळे शरीर नेहमी ऊर्जावान राहते. यासोबतच याच्या सेवनाने शरीरातील रक्ताभिसरण देखील सुधारते. (फोटो: फ्रीपिक)
Health Tips: हृदयविकारापासून ते त्वचेसाठी फायदेशीर आहे ‘हा’ पदार्थ; नियमित्त सेवन केल्याने दुर होतात अनेक आरोग्य समस्या
काही पदार्थांचे नियमित्त सेवन केल्याने अनेक आरोग्य समस्यांपासून आराम मिळतो.
Web Title: Health tips from heart disease to skin regular consumption of this food is beneficial for many health problems arg 02