-
निरोगी आरोग्यासाठी योग्य आहाराचे सेवन महत्वाचं आहे. अनेकदा आपल्या आहाराचा आपल्या शरीरावर परिणाम होतो. विशिष्ट वयानंतर आहारात काही बदल करणे आवश्यक आहे. नाही तर हृदयविकार, मधुमेह, कर्करोग, अशक्तपणा आणि थायरॉईड यांसारख्या अनेक गंभीर आजारांचा धोकाही वाढतो.
-
जाणून घेऊया या पदार्थांबद्दल.
-
विशिष्ट वयानंतर शरीरात हार्मोनल चेंजेस होऊ शकतात. हार्मोन्सचे संतुलन राखण्यासाठी ब्रोकोली, सफरचंद, सूर्यफुलाच्या बिया, ग्रीन टी, ब्लूबेरी, आणि अश्वगंधा यांचा आहारात समावेश करावा. -
रक्ताच्या कमतरतेमुळे, ॲनिमियाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. यासाठी लोहयुक्त पदार्थांचे सेवन करावे. तुम्ही तुमच्या आहारात हिरव्या भाज्या, मनुका, भोपळ्याच्या बिया आणि पालक यासारख्या पदार्थांचा समावेश करू शकता.
-
वाढत्या वयानुसार शरीरातील इस्ट्रोजेनची पातळी कमी होऊ लागते ज्यामुळे हाडे कमकुवत होऊ लागतात. यासाठी व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम युक्त पदार्थांचे सेवन करावे. यासाठी तुम्ही दूध, दही, चिया सीड्स, चीज, बदाम आणि ब्रोकोली यासारख्या खाद्यपदार्थांचे सेवन करू शकता.
-
फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश केल्याने साखरेची पातळी नियंत्रणात राहतेच पण शरीरातील चयापचय क्रियाही व्यवस्थित होते, ज्यामुळे वयाबरोबर वाढत्या वजनापासून सुटका मिळू शकते. -
शरीरात आयोडीन आणि आयर्नचे प्रमाण वाढवण्यासाठी हिरव्या पालेभाज्या, लिंबूवर्गीय फळे, बीन्स यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश करावा.
-
वाढत्या वयाचा परिणाम चेहऱ्यासोबतच शरीरावरही होतो. त्वचा निस्तेज होऊ लागते. यासाठी अँटिऑक्सिडेंटयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा. तुम्ही ग्रीन टी, ब्लॅक टी, आणि कॉफी यांचे सेवन करू शकता.
-
तुम्ही तुमच्या आहारात प्रथिनेयुक्त पोटॅशियमयुक्त आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड असलेले पदार्थांचाही समावेश करू शकता. (अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या फोटो: फ्रीपीक)
Healthy Food: कॅल्शियम, फायबरपासून ते पोटॅशियमपर्यंत निरोगी आरोग्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचे समावेश
30 नंतर महिलांचा आहार कसा असावा? 30 वर्षांनंतर महिलांनी त्यांचा आहार का बदलावा? या वयानंतर कोणता आहार आणि जीवनशैली पाळली पाहिजे?
Web Title: Healthy food from calcium fiber to potassium include these foods in your diet for a good health arg 02