• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. healthy skin do you suffer from itchy skin know which vitamin deficiency in the body can cause these skin problems arg

Healthy Skin: तुम्हालाही सतत त्वचेवर खाज येते? जाणून घ्या शरीरात कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे त्वचेच्या ‘या’ समस्या उद्भवू शकतात

काही जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे त्वचेच्या काही समस्या उद्भवू शकतात.

September 14, 2024 13:32 IST
Follow Us
  • fungal infections
    1/8

    सतत खाज येणे यासारख्या त्वचेच्या समस्या सहसा खूप त्रासदायी असतात आणि आरोग्यावर परिणाम करू शकतात. हे संसर्ग टॉवेल, केसांचा ब्रश, कंगवा आणि कपड्यांमधूनही पसरते. हा बुरशीजन्य संसर्ग पावसात भिजल्याने आणि बराच वेळ पाण्यात राहिल्यानेही अनेकांना होऊ शकतो.

  • 2/8

    कधी हार्मोनल चेंज, खाण्याच्या सवयींमध्ये यांसह अनेक कारणांमुळे खाज येण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. या कारणांमध्ये शरीरातील जीवनसत्त्वांची कमतरता देखील समाविष्ट आहे. काही जीवनसत्त्वांच्या कमतरतेबद्दल जाणून घेऊया, ज्यामुळे या समस्या उद्भवू शकतात.

  • 3/8


    शरीरात व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे त्वचा कोरडी होते, ज्यामुळे तुम्हाला खाज येण्याची समस्या होऊ शकते. याशिवाय, यामुळे त्वचेवर बारीक रेषा आणि सुरकुत्या देखील येऊ शकतात. शरीरात व्हिटॅमिन ए वाढवण्यासाठी अंडी किंवा लोणी यांसारख्या पदार्थांचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते.

  • 4/8

    व्हिटॅमिन बी-3 ला ‘नियासिन’ असेही म्हणतात. शरीरात त्याच्या कमतरतेमुळे खाज सुटणे, पुरळ उठणे आणि जखमा होऊ शकतात. विशेषत: सूर्यप्रकाशाच्या जास्त संपर्कामुळे अशा प्रकारची समस्या उद्भवू शकते. शरीरातील व्हिटॅमिन बी-3 प्रमाण वाढवण्यासाठी चिकन, मटार, मासे, मशरूम, ब्रोकोली आणि बदाम यांचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते.

  • 5/8


    शरीरात व्हिटॅमिन बी-12 च्या कमतरतेमुळे तुम्हाला खाज येण्याची समस्या देखील होऊ शकते. यामुळे तुम्हाला अशक्तपणा आणि हात सुन्न होणे यासारख्या इतर समस्या होतात. हळूहळू या समस्या तुमच्या त्वचेवरही परिणाम करू शकतात.

  • 6/8


    रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच व्हिटॅमिन सी जखमा भरण्यासही मदत करते. शरीरात त्याच्या कमतरतेमुळे त्वचा कोरडी होऊ शकते आणि ज्यामुळे खाज येण्याची समस्या वाढते.

  • 7/8

    व्हिटॅमिन डी त्वचेसाठी खूप महत्वाचे आहे. जेव्हा शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असते तेव्हा त्वचा कमकुवत होते आणि बॅक्टेरिया किंवा बुरशीजन्य संक्रमणास बळी पडते. सूर्यकिरणांपासून आपल्या शरीराला व्हिटॅमिन डी मिळते आणि ते त्वचेला संसर्गापासून वाचवण्यास मदत करते.

  • 8/8



    व्हिटॅमिन ईमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. व्हिटॅमिन ई त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत करते आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्मांमुळे त्वचा सुरक्षित ठेवते. व्हिटॅमिन ईच्या कमतरतेमुळे खाज येण्यासारख्या समस्या वाढू शकतात, कारण त्वचेचा संरक्षणात्मक स्तर कमकुवत होतो. (फोटो स्त्रोत: फ्रीपिक)

TOPICS
मराठी बातम्याMarathi Newsस्कीन केअरSkin Careहेल्थ न्यूजHealth News

Web Title: Healthy skin do you suffer from itchy skin know which vitamin deficiency in the body can cause these skin problems arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.