• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. what is the right time of morning breakfast dinner ndj

Breakfast & Dinner Time : सकाळचा नाश्ता आणि रात्रीच्या जेवणाची योग्य वेळ कोणती?

मल्होत्रा ​​यांनी दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण यामध्ये १२-१४ तासांचे अंतर ठेवण्याचे फायदे खालीलप्रमाणे सांगितले आहेत.

September 15, 2024 12:25 IST
Follow Us
  • Breakfast & Dinner Time
    1/12

    सकाळचा नाश्ता हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि सकाळच्या नाश्त्याचा थेट संबंध रात्रीच्या जेवणाच्या वेळेबरोबर केला जातो. रात्रीचे जेवण आणि सकाळचा नाश्ता हा ठराविक काळामध्ये करणे हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. (Photo : Freepik)

  • 2/12

    आपल्या जेवणाच्या वेळेचा आपल्या आरोग्यावर परिणाम दिसून येतो. चयापचय क्रिया आणि निरोगी जीवनशैलीसाठी रात्रीचे जेवण आणि नाश्ता यामध्ये ठराविक अंतर असणे महत्त्वाचे आहे. (Photo : Freepik)

  • 3/12

    आहारतज्ज्ञ सल्लागार कनिक्का मल्होत्रा यांनी द इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, रात्रीचे जेवण आणि नाश्ता यांच्यामध्ये अंदाजे १२ ते १४ तासांचे अंतर असावे. हा काळ उपवासाचा मानला जातो आणि यामुळे आपल्याला अनेक आरोग्याचे फायदे दिसून येतात. ते फायदे कोणते, जाणून घेऊ या.मल्होत्रा ​​यांनी दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण यामध्ये १२-१४ तासांचे अंतर ठेवण्याचे फायदे खालीलप्रमाणे सांगितले आहेत. (Photo : Freepik)

  • 4/12

    चयापचय क्रिया सुधारते : १२-१४ तासांच्या या उपवास कालावधीत फक्त शरीरातील ग्लुकोजवर अवलंबून न राहता चरबीचा वापर वाढवून चयापचय क्रिया सुरळीत ठेवता येते. यामुळे लठ्ठपणा आणि मधुमेहाचा धोका कमी होतो. (Photo : Freepik)

  • 5/12

    हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधित आरोग्य सुधारते : रात्रीचे जेवण आणि नाश्ता यामध्ये १३ तासांचे अंतर ठेवल्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. (Photo : Freepik)

  • 6/12

    पचन क्रिया सुधारते : या अंतरामुळे पचनासाठी पुरेसा वेळ मिळतो, ज्यामुळे ॲसिडिटीसारख्या समस्या उद्भवत नाही आणि शरीराला चांगले पोषक घटक मिळतात. (Photo : Freepik)

  • 7/12

    झोपेची गुणवत्ता सुधारते : रात्री लवकर जेवण केल्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते आणि चांगली झोप येते. (Photo : Freepik)

  • 8/12

    नाश्ता आणि रात्रीच्या जेवणाची योग्य वेळ
    मल्होत्रा ​​सांगतात की, रात्रीचे जेवण आणि नाश्त्यासाठी खालील जेवणाच्या वेळा आहेत :
    रात्रीचे जेवण : संध्याकाळी ६ ते ८ वाजतादरम्यान रात्रीचे जेवण शरीरासाठी फायदेशीर असते. यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते आणि चांगली झोप येते.
    नाश्ता : सकाळी ७ ते ९ दरम्यान नाश्ता करावा, यामुळे दिवसभर चयापचय क्रिया सुरळीत राहते आणि शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते. (Photo : Freepik)

  • 9/12

    रात्रीचे जेवण आणि सकाळच्या नाश्त्यादरम्यान १२ तास नियमित काहीही न खाल्ल्यामुळे शरीराचे वेळापत्रक तयार होते आणि चयापचय क्रिया सुधारण्यास मदत होते. (Photo : Freepik)

  • 10/12

    सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही सामान्य मार्गदर्शक तत्वे आहेत, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. वैयक्तिक गरजा, जीवनशैली आणि संपूर्ण आरोग्याच्या परिस्थितीचा थेट परिणाम जेवणाच्या वेळेवर दिसू शकतो (Photo : Freepik)

  • 11/12

    त्यामुळे आहार आणि आहाराच्या वेळेत बदल करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. (Photo : Freepik)

  • 12/12

    जेवणाच्या वेळेबाबत काळजी घेत आपण आपल्या दिनचर्येत याचा समावेश करू शकतो, ज्याचा चांगला परिणाम आपल्या आरोग्यावर दिसून येईल. (Photo : Freepik)

TOPICS
जेवणMealलाइफस्टाइलLifestyleहेल्थ न्यूजHealth News

Web Title: What is the right time of morning breakfast dinner ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.