-
जर तुम्हाला तुमची त्वचा चमकदार बनवायची असेल, तर तुम्हाला तुमच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण आणि लोहाची पातळी योग्य राखावी लागेल. याशिवाय तुमच्या शरीरात हायड्रेशनसोबत व्हिटॅमिन सीचे प्रमाणही चांगले असले पाहिजे जेणेकरून तुमची त्वचा स्वच्छ आणि निरोगी राहते.
-
बदाममध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट असतात जे सूर्याच्या किरणांपासून त्वचेचे रक्षण करतात. हे त्वचा मऊ आणि चमकदार ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे सकाळी लवकर भिजवलेले बदाम खाल्ल्याने त्वचा चमकदार होते.
-
मनुकामध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. हे चेहऱ्यावरील काळे डाग आणि पुरळ कमी करतात. काळे मनुके त्वचेला डिटॉक्सिफाई करून त्वचा आणखी चमकदार बनवतात. निरोगी त्वचेसाठी तुम्ही भिजवलेले मनुके खाऊ शकतात.
-
पिस्त्यात व्हिटॅमिन ई असते, ज्यामुळे त्वचेचे रक्षण होते. हे कोरडेपणा कमी करून आणि आपली त्वचा तेजस्वी बनवू शकते.
-
काजूमध्ये लोह, फॉस्फरस, तांबे, व्हिटॅमिन सी आणि सेलेनियम भरपूर प्रमाणात असते. हे कोलेजन पातळी सुधारण्यास मदत करतात. हे प्रोटीन त्वचेला तरुण ठेवते आणि सुरकुत्या कमी करण्यास मदत करते.
-
खजूरमध्ये जीवनसत्त्व अ आणि ब असते. हे त्वचेची लवचिकता सुधारतात आणि हे कोरड्या त्वचेसाठी फायदेशीर मानले जातात. विशेषत: सुरकुत्या दूर करण्यासाठी खजूर उपयुक्त ठरू शकतात.
-
अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड असते आणि हे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकतात. अक्रोड पेस्ट एक उत्कृष्ट एक्सफोलिएटिंग स्क्रब म्हणून वापरली जाऊ शकते. हे सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण करतात, सुरकुत्या कमी करतात आणि तुमची त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते.
-
अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.
Skin Care: महिन्याभरात वाढेल चेहऱ्यावरील चमक फक्त दररोज खा ‘हे’ ड्रायफ्रूट्स; निरोजी त्वचेसह होतील अनेक फायदे
Skin Care: चमकदार त्वचेसाठी दररोज खा हे ड्रायफ्रुट्स.
Web Title: Skin care glow on face will increase within a month just eat these dry fruits every day know other benefits for healthy skin arg 02