-
प्रश्न कोणताही असो; पण त्याच्या उत्तरासाठी आपण लगेच गूगल करतो. कारण- अजिबात डोके न वापरता, अगदी अवघ्या काही सेकंदांत उत्तर मिळले. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हे इंटरनेटवर उपलब्ध आहे. विशेष म्हणजे गूगलच्या माध्यमातून जी काही माहिती मिळते, त्यावर आपण कसलाही विचार न करता, आंधळेपणाने विश्वास ठेवतो.
-
अनेक जण मधुमेह, लठ्ठपणा, रक्तदाब, हृदयविकार यांसारख्या आरोग्य समस्यांवरही गुगलवरून माहिती घेत, ती खरी मानून त्यानुसार उपचार सुरू करतात किंवा सुरू असलेले उपचार थांबवतात.
-
जर तुम्हीदेखील यापैकी एक असाल तर तुम्ही इडियट आहात. होय, तुम्ही इडियट आहात… अनेकांना हा आपला अपमान वाटू शकतो; पण हा अपमानजनक शब्द नाही, तर तो एक आजार आहे.
-
‘इडियट सिंड्रोम’ असे या आजाराचे नाव आहे. पण हा आजार नेमका काय आहे, याची लक्षणे काय आणि त्यावर कोणते उपाय आहेत का? सविस्तर जाणून घेऊ…
-
इडियट सिंड्रोम ही अशी वैद्यकीय स्थिती आहे; ज्यामध्ये एखादी व्यक्ती आरोग्याशी संबंधित माहितीसाठी डॉक्टरांपेक्षा इंटरनेटवर अधिक विश्वास ठेवते. अशा व्यक्ती त्यांच्या आजारांवरील उपचारांसाठी इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीवर पूर्णपणे अवलंबून राहतात, याच बाबीला ‘इडियट सिंड्रोम’, असे म्हणतात. मात्र
-
मात्र, यातील इडियटचा अर्थ जरा वेगळा आहे; ज्याला डिराइव्ड इन्फॉर्मेशन ऑब्स्ट्रक्शन ट्रीटमेंट (Internet Derived Information Obstruction Treatment) असे म्हणतात. सध्याच्या काळात अनेक लोक त्याला बळी पडत आहेत.
-
त्यामुळे अनेक वेळा एखादी व्यक्ती डॉक्टरांचे सुरू असलेले उपचार थांबवत, इंटरनेटवरून त्या आजाराबाबत चुकीची माहिती घेते आणि त्यानुसार उपचार सुरू करते; जे काही वेळा घातक ठरू शकते. अशा लोकांचा इंटरनेटवरील वैद्यकीय माहितीवर अधिक विश्वास असतो.
-
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनने (WHO) या परिस्थितीला ‘इन्फोडेमिक’, असे म्हटले आहे; ज्यामुळे आरोग्य सेवेमध्ये एक जटिल परिस्थिती निर्माण झाली आहे.
-
PubMed मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, आयडीओटी सिंड्रोम हा आजार इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या आजारांविषयीच्या जास्तीच्या माहितीचा परिणाम आहे; ज्यामुळे लोकांच्या मनात आरोग्य तज्ज्ञांबाबत अविश्वास निर्माण झाला आहे.
-
इडियट सिंड्रोम किंवा सायबरकॉन्ड्रिया हा इंटरनेटशी संबंधित फोबिया आहे; जो ऑनलाइन आरोग्य माहितीच्या वापरामुळे होतो. त्यामध्ये एखादी व्यक्ती विशिष्ट आजाराबाबत अतिशय किंवा अवास्तव भयभीत असते.
-
२) आजाराची माहिती मिळाल्यानंतरही तो त्या पद्धतीने उपचार करून बरा झाला नाही, तर व्यक्ती तो आजार मानू लागतो. इंटरनेटवर आजाराबद्दल वेगळी माहिती मिळाल्यावर व्यक्ती चिंताग्रस्त होऊ लागते आणि नैराश्यात जाते. चुकीच्या माहितीमुळे एखाद्या व्यक्तीला गंभीर आजार झाल्यासारखे वाटू लागते.
-
२) ऑनलाइन वाचलेल्या माहितीवर प्रश्न विचारा. चिंताग्रस्त किंवा तणावग्रस्त होण्यापूर्वी वैद्यकीय डॉक्टरांचा सल्ला घ्या. आरोग्याशी संबंधित समस्यांसाठी डॉक्टरांवर विश्वास ठेवा. कोणत्याही माहितीवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका.
तुम्ही ‘IDIOT’ तर नाही ना? हा अपमान नाही; आजार आहे, काय आहेत लक्षणे आणि उपाय, वाचा
Idiot Syndrome : ‘इडियट सिंड्रोम’ हा आजार नेमका काय आहे, याची लक्षणे काय आणि त्यावर कोणते उपाय आहेत का? सविस्तर जाणून घेऊ…
Web Title: Idiot syndrome what is idiot syndrome cyberchondria infodemic who real condition idiot syndrome symptoms and preventions sjr