-
आपल्यापैकी बहुतेकांना कधीकधी लघवी करताना जळजळ आणि तीव्र वेदना जाणवतात. साधारण आपण खूप बाहेर फिरतो, गरम खातो किंवा खूप काम करुन थकतो तेव्हा आपल्याला लघवीमध्ये अशा समस्या उद्भवू शकतात.
-
जास्त पाणी प्यायल्यानंतर अनेकदा बरे वाटते. पण यानंतरही लघवीत जळजळ होत असेल तर दुर्लक्ष करु नका. अनेकदा ही किडनी आणि प्रोस्टेटशी संबंधित गंभीर आजारांची चिन्ह असू शकतात
-
द्यकीय भाषेत याला डिसूरिया असे म्हणतात, असे सतत दोन ते तीन दिवस होत राहिल्यास या समस्यांकडे दुर्लक्ष करु नका, कारण यानंतर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
-
लघवीमध्ये जळजळ होण्याची अनेक कारणे असू शकतात. परंतु हे मुख्यत: हे किडनी किंवा प्रोटेस्टमधील समस्यांमुळे होते.
-
अनेकदा लघवीमधील जळजळ वाढल्यास लोक सावध होतात परंतु त्यावर कोणते उपचार करावे हे समजत नाही. अशावेळी लघवीमधील जळजळ कोणत्या आजारांचे कारण असू शकते जाणून घेऊ…
-
१) किडनी स्टोन – मेडिकल न्यूज टुडेच्या वृत्तानुसार, जेव्हा किडनीमध्ये कॅल्शियमच्या डिपोजिशनचे प्रमाण जास्त होते, तेव्हा किडनीमध्ये स्टोन तयार होतात, किडनी स्टोन झाल्यानंतर लघवी करताना जळजळ होणे आणि वेदना होऊ लागतात.
-
यामध्ये लघवीचा रंग गुलाबी किंवा तपकिरी होतो. त्यात ताप, उलट्या, अस्वस्थता यांसारखी लक्षणेही दिसू लागतात.
-
२) प्रोस्टेट इन्फेक्शन- पुरुषांमध्ये प्रोस्टेट ही एक अत्यंत महत्त्वाची ग्रंथी आहे जिचा थेट संबंध प्रजननक्षमतेशी आहे. कधीकधी प्रोस्टेटमध्ये संसर्ग होतो, याला Prostatis म्हणतात. लैंगिक संक्रमित रोगांमुळे प्रोस्टेटमध्ये सूज येऊ शकते.
-
प्रोस्टेटमध्ये संसर्ग झाल्यामुळे, लघवी करताना खूप जळजळ होते आणि मूत्राशय आणि प्रायव्हेट पार्टमध्ये वेदना देखील होऊ शकतात.
-
३) UTI – लघवी करताना जळजळ किंवा वेदनादायक लघवी होणे हे देखील लघवी मार्गात संसर्ग झाल्यामुळे होते.
-
यामुळे लघवी मार्गात बॅक्टेरियाची संख्या जास्त प्रमाणात वाढते आणि लघवीमध्ये जळजळ होऊ शकते. या स्थितीत वारंवार लघवी करण्याची इच्छा होते आणि कधीकधी लघवीतून रक्त येऊ लागते.
-
४) STI- क्लॅमिडीया, गोनोरिया, हर्प्स इत्यादी लैंगिक संक्रमित संसर्गांमुळे देखील लघवी करताना जळजळ होते. या स्थितीत विविध प्रकारची लक्षणे दिसून येतात. यामध्ये प्रायव्हेट पार्टच्या आजूबाजूला मुरुम किंवा फोडही येऊ शकतात.
-
दोन-तीन दिवस सतत लघवीला त्रास होत असेल तर त्याला हलक्यात घेऊ नका. अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तपासणीनंतर लघवीमध्ये जळजळ कोणत्या कारणांमुळे होते हे डॉक्टर चाचण्यांद्वारे शोधून काढतील.
-
यासाठी सामान्य अँटीबायोटिक्स आहेत, परंतु आपल्याला कोणत्या औषधाची आवश्यकता आहे हे केवळ डॉक्टरच सांगू शकतात. (फोटो क्रेडिट – Freepik)
Painful Urination : लघवी करताना जळजळ, वेदना जाणवतेय? ही असू शकतात ‘या’ ४ आजारांची लक्षणे, असे करा उपचार
Painful urination : लघवी करताना जळजळ, वेदना जाणवल्यास काय उपाय करावे जाणून घेऊ…
Web Title: Health urine problem diy painful urination may cause of kidney and prostate problems know home remedies sjr