-
ज्योतिषशास्त्रात शनीला खूप महत्वपूर्ण ग्रह मानले जाते. शनीला कर्मफळदाता आणि न्यायप्रिय देवता देखील म्हटलं जातं. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शनी नेहमीच चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तीना शुभ फळ प्रदान करतो. तर इतरांना विणाकारण त्रास देणाऱ्या आणि वाईट कर्म करणाऱ्यांवर शनीचा नकारात्मक प्रभाव पडतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
याव्यतिरिक्त शनीचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तनही खूप खास मानले जाते. शनी सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे; त्यामुळे त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी अडीच वर्षाचा कालवधी लागतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तसेच वेळोवेळी तो नक्षत्र परिवर्तनही करतो. सध्या शनी त्याच्या मूळ त्रिकोण राशीत उपस्थित असून तो २०२५ मध्ये मीन राशीत तब्बल ३० वर्षानंतर राशी परिवर्तन करणार आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रानुसार शनी सध्या पूर्वीभाद्रपद नक्षत्रामध्ये असून तो ३ ऑक्टोबर रोजी १२ वाजून ३० मिनिटांनी शतभिषा नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे आणि २७ डिसेंबरपर्यंत तो या नक्षत्रामध्ये असेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
या नक्षत्राचा स्वामी ग्रह राहू असून कुंभ रास आहे. शनीचे हे नक्षत्र परिवर्तन काही राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शनीचा शतभिषा नक्षत्रातील प्रवेश वृषभ राशीच्या व्यक्तींना खूप लाभदायी ठरेल. या काळात तुम्हाला प्रत्येक कामात हवे तसे यश मिळेल. आरोग्य चांगले राहील. आयुष्यात मानसन्मान आणि कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
धनु राशीच्या व्यक्तींना शनीचा शतभिषा नक्षत्रातील प्रवेश खूप सकारात्मक फळ देणारा ठरणार आहे. या काळात तुम्हाला धनलाभ होईल आणि तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील, करिअरमध्ये हवे तसे यश मिळविता येईल. व्यवसायात हवी तशी प्रगती पाहायला मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
दिवाळीआधी शनी देणार पैसाच पैसा; नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ दोन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात होणार भौतिक सुखाची वाढ
Shani Gochar 2024: शनी नेहमीच चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तीना शुभ फळ प्रदान करतो. तर इतरांना विणाकारण त्रास देणाऱ्या आणि वाईट कर्म करणाऱ्यांवर शनीचा नकारात्मक प्रभाव पडतो.
Web Title: Shani will give money nakshatra transformation there will be an increase in material happiness in the life of these two zodiac signs sap