-
हृदयरोगींना त्यांच्या आहाराकडे खूप लक्ष द्यावं लागतं. असे अनेक ड्रायफ्रुट्स आहेत ज्यांचे सेवन हृदयरोग्यांसाठी फायदेशीर असल्याचे सांगितले जाते, त्यापैकी एक अक्रोड आहे. अक्रोडाचे सेवन हृदयरोग्यांसाठी रामबाण औषधापेक्षा कमी नाही. पण तुम्हाला माहित आहे का की एका दिवसात किती अक्रोड खावेत आणि त्याचे सेवन करण्याचा योग्य मार्ग कोणता आहे?
-
अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स मुबलक प्रमाणात आढळतात. फॉस्फरस, प्रथिने, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सेलेनियम सारखे पोषक घटक
हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. -
अक्रोडमध्ये आढळणारे ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवण्यास मदत करतात. अक्रोडचे नियमित सेवन केल्याने रक्तदाब कमी होण्यासही मदत होते. तज्ञांच्या मते उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी अक्रोडाचे सेवन अवश्य करावे.
-
अक्रोडमध्ये कॅलरीज चांगल्या प्रमाणात असतात, त्यामुळे ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने वजन वाढू शकते.
-
अक्रोडाचे सेवन मेंदूसाठीही फायदेशीर असल्याचे सांगितले जाते.
-
अक्रोडाचे नियमित सेवन केल्याने मेंदूची शक्ती वाढते. यासोबतच मन शांत राहते आणि तणावातूनही आराम मिळतो.
-
अक्रोडमध्ये फायबरसोबतच प्रथिने चांगल्या प्रमाणात आढळते. यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
-
अक्रोडमध्ये भरपूर फायबर असते ज्यामुळे बद्धकोष्ठतेचा समस्येपासून सुटका मिळते.
-
अक्रोडमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरसचे प्रमाण चांगले असते, ज्याच्या सेवनाने हाडे मजबूत होतात. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.
WALNUT BENEFITS: एका दिवसात किती अक्रोड खावे? हृदयरुग्णांना होऊ शकतात ‘हे’ फायदे; वाचा तज्ञांचा सल्ला
असे अनेक ड्रायफ्रुट्स आहेत ज्यांचे सेवन हृदयरोग्यांसाठी फायदेशीर असल्याचे सांगितले जाते, त्यापैकी एक अक्रोड आहे. जाणून घ्या अक्रोडचे फायदे.
Web Title: Walnut benefits how many walnuts to eat in a day these beneficial for heart patients read expert advice arg 02