-
योगाद्वारे अनेक आरोग्य समस्यांपासून मुक्ती मिळू शकते. योग केवळ शरीरासाठीच नाही तर मानसिक आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. जाऊन घेऊया काही योगासने ज्यांच्या नियमित सराव केल्याने अनेक आरोग्य समस्या दूर होऊ शकतात.
-
सूर्यनमस्कार हे संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे म्हटले जाते. शरीराला लवचिकता आणि ऊर्जा प्रदान करण्याव्यतिरिक्त, इतर अनेक गोष्टींमध्ये हे फायदेशीर ठरू शकते.
-
भुजंगासन हा योग छाती आणि फुफ्फुसासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. याशिवाय हृदयासाठीही ते फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. हे नियमितपणे केल्याने खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते.
-
पश्चिमोत्तानासन हा योग सराव केल्याने मन शांत राहते, तणाव कमी होतो आणि पचनसंस्थाही व्यवस्थित होते. याशिवाय, खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी देखील हे खूप प्रभावी असल्याचे म्हटले जाते.
-
धनुरासन योगाचा नियमित सराव केल्याने पाठ मजबूत होते आणि छाती आणि फुफ्फुसांची क्षमता देखील सुधारते. याशिवाय हे योगासन हृदयाशी संबंधित समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करू शकतात.
-
त्रिकोनासन हा योग सराव केल्याने पचनक्रिया तर सुधारतेच पण हृदयाचे आरोग्यही सुधारते.
-
वृक्षासनचे सराव केल्याने हाडे मजबूत होतात.
-
उत्कटासन योगाचा नियमित सराव केल्याने शरीरात रक्ताभिसरणही व्यवस्थित होते.
-
अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या. (सर्व फोटो : फ्रीपीक)
Yoga Practice: नियमितपणे ‘हे’ योगासने केल्याने होतात अनेक आरोग्य फायदे; पाहा यादी
Yoga Practice: जाणून घ्या नियमित योगासने केल्याने होणाऱ्या फायद्यांबाबत.
Web Title: Yoga practice practicing this yoga regularly has many health benefits see the list arg 02