-
ज्योतिषशास्त्रात शनीला खूप महत्वपूर्ण ग्रह मानले जाते. शनीला कर्मफळदाता आणि न्यायप्रिय देवता देखील म्हटलं जातं. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शनी नेहमीच चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तीना शुभ फळ प्रदान करतो. तर इतरांना विणाकारण त्रास देणाऱ्या आणि वाईट कर्म करणाऱ्यांवर शनीचा नकारात्मक प्रभाव पडतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
याव्यतिरिक्त शनीचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तनही खूप खास मानले जाते. शनी सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे; त्यामुळे त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी अडीच वर्षाचा कालवधी लागतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सध्या शनी त्याच्या मूळ त्रिकोण राशीत उपस्थित असून तो २०२५ मध्ये मीन राशीत तब्बल ३० वर्षानंतर राशी परिवर्तन करणार आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रानुसार शनी सध्या पूर्वीभाद्रपद नक्षत्रामध्ये असून तो ३ ऑक्टोबर रोजी १२ वाजून ३० मिनिटांनी शतभिषा नक्षत्रामध्ये प्रवेश केला असून आणि २७ डिसेंबरपर्यंत तो या नक्षत्रामध्ये असेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
या नक्षत्राचा स्वामी ग्रह राहू असून कुंभ रास आहे. शनीचे हे नक्षत्र परिवर्तन काही राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शनीचा शतभिषा नक्षत्रातील प्रवेश वृषभ राशीच्या व्यक्तींना खूप लाभदायी ठरेल. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. यावेळी तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारेल. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. या काळात तुम्हाला प्रत्येक कामात हवे तसे यश मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
धनु राशीच्या व्यक्तींना शनीचा शतभिषा नक्षत्रातील प्रवेश खूप सकारात्मक फळ देणारा ठरणार आहे. या काळात भाग्याची पूरेपूर साथ मिळेल. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. आर्थिक बाजू भक्कम होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
शनी देणार भरपूर पैसा; नक्षत्र परिवर्तनामुळे ‘या’ दोन राशींच्या आयुष्यात येणार पैसा अन् प्रतिष्ठा
Shani nakshatra transit 2024: सध्या शनी त्याच्या मूळ त्रिकोण राशीत उपस्थित असून तो २०२५ मध्ये मीन राशीत तब्बल ३० वर्षानंतर राशी परिवर्तन करणार आहे.
Web Title: Shani nakshatra transit 24 money and prestige will come in the life of these two zodic sign nakshatra transformation sap