-
ज्योतिषशास्त्रात नवग्रहांतील ग्रहांची काही ग्रहांबरोबर मित्रता तर काही ग्रहांबरोबर शत्रुत्व असते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
बऱ्याचदा एका राशीत दोन किंवा त्याहून अधिक ग्रहांनी प्रवेश केल्यामुळे युती निर्माण होते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
दिवाळीनंतर कर्मफळदाता शनी आणि भौतिक सुखाचा कारक ग्रह शुक्राची युती निर्माण होणार आहे. ही युती कुंभ राशीमध्ये तब्बल ३० वर्षानंतर बनणार असून याच्या शुभ प्रभावाने काही राशींच्या व्यक्तींना अनेक फायदे होतील.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स)
-
या व्यक्तींच्या आयुष्यात मान-सन्मानासह , धनलाभ होण्याचीही दाट शक्यता आहे.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शनी आणि शुक्राचा संयोग मेष राशीच्या व्यक्तींना खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुमचा भाग्योदय होईल. परिक्षेची तयारी करत असलेल्यांना स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील तसेच जे अविवाहित आहेत, त्यांचे लग्न ठरेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शनी आणि शुक्राची युतीमुळे मिथुन राशीच्या व्यक्तींना अनेक आर्थिक लाभ होतील. तुमची आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. या काळात उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कुंभ राशीच्या व्यक्तींना शनी आणि शुक्राची युती प्रत्येक कामात यश मिळवून देईल. या काळात तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल. आयुष्यात मानसन्मान आणि कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल. तुमच्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी घडतील, त्यामुळे या काळात तुमच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
शनी-शुक्र देणार बक्कळ पैसा; दिवाळीनंतर निर्माण करणार अद्भूत संयोग, ‘या’ तीन राशींची होणार चांदी
Venus and Saturn Yuti 2024: दिवाळीनंतर कर्मफळदाता शनी आणि भौतिक सुखाचा कारक ग्रह शुक्राची युती निर्माण होणार आहे.
Web Title: Shani venus combination will be created after diwali these three zodiac signs will be earn lots off money sap