• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. how make career in dance list of things we have to do to succeed in the dance industry ndj

Dance As a Career : डान्स क्षेत्रात करिअर कसे घडवावे?

Dance As a Career : आता तुम्हाला प्रश्न पडला असेल नृत्यक्षेत्रामध्ये करिअर कसं घडवू शकतो? चला तर जाणून घेऊ या.

October 18, 2024 18:54 IST
Follow Us
  • Dance As a Career
    1/9

    नृत्य ही एक कला आहे. अनेक जण कलेकडे आवड म्हणून पाहतात पण कला सुद्धा करिअर घडू शकते, याचा विचार फार क्वचित लोक करतात. (Photo : Freepik)

  • 2/9

    सध्याच्या स्पर्धात्मक जगात भरपूर संधी मिळतात फक्त संधीचे सोने करता आले पाहिजे. तुम्हाला नृत्यकलेची आवड असेल तर तुम्ही त्यात करिअर घडवू शकता. (Photo : Freepik)

  • 3/9

    आता तुम्हाला प्रश्न पडला असेल नृत्यक्षेत्रामध्ये करिअर कसं घडवू शकतो? चला तर जाणून घेऊ या. (Photo : Freepik)

  • 4/9

    आपली आवड जपा
    प्रत्येकाकडे एक कला असेल जी त्यांना इतरांपेक्षा वेगळी बनवते. त्यांचे ते स्वप्न असते. जर तुमचे स्वप्न नृत्य असेल त्याला जपा. तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा आणि आपली आवड जपा. यापेक्षा कोणतीही गोष्ट तुमच्यासाठी महत्त्वाची नाही. (Photo : Freepik)

  • 5/9

    प्रत्येक दिवशी नवीन काहीतरी शिका
    नृत्य ही अशी कला आहे जी दरदिवशी विकसित होत असते आणि तुम्हाला नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. तुम्ही नवनवीन स्टेप्स शिकू शकता, तुम्ही नृत्यदिग्दर्शन करू शकता. खरं तर डान्सरला आयुष्यात कधीच कंटाळा येत नाही.तुम्हाला तुमच्या आजुबाजूला असणाऱ्या डान्सर्सकडून प्रेरणा मिळेल. (Photo : Freepik)

  • 6/9

    स्टेज हे तुमचे दुसरे घर आहे
    प्रत्यक्ष प्रेक्षकांसमोर सादर करणे यापेक्षा दुसरा मोठा आनंद कोणताही नाही. तुम्ही व्यावसायिक नृत्याला तुमच्या करिअरचा पर्याय बनवू शकता, तुम्ही स्वत:ला स्टेज शोचा एक भाग बनू शकता. मेकअप, पोशाख, रंगमंच आणि लाइव्ह प्रेक्षक हे तुमच्या नियमित वेळापत्रकाचा एक महत्त्वाचा भाग बनवू शकता. (Photo : Freepik)

  • 7/9

    नेहमी ज्ञान शेअर करा
    ज्ञान एक उत्तम दान आहे. जेव्हा तुम्ही तुमचे ज्ञान इतरांबरोबर शेअर करता तितके ते तुम्हाला परत मिळते. तुम्ही अनेक लोकांना प्रेरणा देऊ शकता. सर्वांना बरोबर घेऊन तु्म्ही तुमच्या आयुष्यात मोठे होऊ शकता. (Photo : Freepik)

  • 8/9

    शिकत असताना कमवा
    तुम्हाला जे आवडते ते शिका पण त्याबरोबर कमवा. क शिकवण्यापासून ते सादरीकरणापर्यंत, स्टेजवर नृत्य करण्यापासून ते चित्रपटांमध्ये नृत्य करण्यापर्यंत, विद्यार्थ्यांना शिकवण्यापासून ते संगीत नृत्यदिग्दर्शनापर्यंत अनेक संधी आहेत फक्त संधीचे सोने करता आले पाहिजे. (Photo : Freepik)

  • 9/9

    संबंधित आवड शोधा
    अनेकदा एखाद्या कलेच्या संबंधित क्षेत्रात करिअर घडवू शकता. बऱ्याचदा नृत्यामुळे अनेक क्षेत्रात संधी मिळतात. तुम्ही कॉस्च्युम डिझायनिंग, व्हिडिओ आणि म्युझिक एडिटिंग, सेट आणि स्टेज मॅनेजमेंट, प्रोडक्शन आणि बरेच काही शिकू शकता. यामुळे तुम्ही त्या संबंधित क्षेत्रात तज्ज्ञ होऊ शकता (Photo : Freepik)

TOPICS
करिअरCareerलाइफस्टाइलLifestyle

Web Title: How make career in dance list of things we have to do to succeed in the dance industry ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.