-
दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आहे. दिवाळीला दारात कंदील, पणत्या तर दारात दररोज छान रांगोळी काढली जाते. रांगोळी काढण्यासाठी बाजारात विविध सामान उपलब्ध आहेत. पण, अनेकदा असं होतं की, तुम्ही खरेदी करताना रांगोळीत रंग भरण्यासाठी काही रंग आणायला विसरता किंवा तुमच्या मनासारखा रंग तुम्हाला मिळत नाही. (फोटो सौजन्य : @Pixabay)
-
अशा वेळी तुम्ही गेल्यावर्षीचे जुने रंग वापरून किंवा जे तुमच्याकडे उपलब्ध आहेत त्याच रंगांमधून तुम्ही वेगळा रंग घरीच तयार करू शकता. रांगोळी कोणत्या रंगाने आकर्षित कराल आणि कोणते रंग तुम्ही घरी तयार करू शकता, याच्या काही खास टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.(फोटो सौजन्य : @Pixabay)
-
अनेक जण खूप छान रांगोळी काढतात, पण रंग भरताना त्यांना कोणता रंग भरायचा यात अनेकांची गडबड होते आणि मग काढलेली रांगोळी आकर्षित दिसत नाही. तर या पुढील टिप्सचा तुम्ही नक्की उपयोग करून बघू शकता. (फोटो सौजन्य : @Pixabay)
-
रंग कसे तयार कराल : १. तांबडा आणि पिवळा रंग मिक्स करून तुम्ही ‘नारंगी’ रंग तयार करू शकता. २. पिवळा आणि हिरवा रंग मिक्स करून ‘पोपटी’ रंग तयार करा. २. हिरवा आणि काळा रंग मिक्स केलात तर ‘काळसर हिरवा’ हा अनोखा रंग तुम्हाला तयार झालेला दिसेल. ४. पांढरी रांगोळी मिक्स करून पुढील आकर्षक रंग तुम्ही तयार करू शकता. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
पिवळ्या रंगात थोडी पांढरी रांगोळी मिक्स केलीत तर तुम्हाला ‘पुसट पिवळा’ हा रंग तयार होईल.काळ्या रंगात पांढरी रांगोळी मिक्स केलीत तर तुम्हाला ‘राखाडी’ रंग तयार झालेला दिसेल. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
तर नारंगी आणि पांढरी रांगोळी मिक्स करून तुम्हाला ‘बदामी’ रंग तयार झालेला दिसेल.तसेच जांभळ्या रंगात पांढरी रांगोळी मिक्स केल्यावर तुम्हाला ‘कोनफळी’ हा रंग तयार झालेला दिसेल. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
रांगोळी काढताना तुम्ही “नारंगी व निळा, गुलाबी व हिरवा, तांबडा व आकाशी, तपकिरी व पोपटी, मोरपिशी व काळा, पिवळा जांभळा आणि गुलाबी” या आदी रंगांच्या रंगसंगती वापरू शकता. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
त्याचबरोबर दोन गडद रंग शेजारी-शेजारी वापरू नये.दररोज रांगोळीचे रंग बदलत राहावेत. लहान रांगोळीत दोन किंवा तीनच रंग भरावेत. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
रांगोळी पूर्ण काढून झाल्यावर वरून चमकी (सोनेरी, चंदेरी) टाकावी, त्यामुळे रांगोळी आणखीन आकर्षित दिसते.दिवाळीत रोज विविध प्रकारच्या रांगोळ्या काढून तुम्ही वर सांगितल्याप्रमाणे नवीन रंग घरच्या घरी तयार करू शकता आणि तुमची रांगोळी आकर्षित करू शकता. (फोटो सौजन्य : @Freepik)
Diwali 2024 : दिवाळीत रांगोळी काढताना ‘या’ ट्रिक्सची होईल मदत; घरबसल्या तयार करता येतील नवीन रंग
Diwali 2024 Rangoli Tips : तुम्ही गेल्यावर्षीचे जुने रंग वापरून किंवा जे तुमच्याकडे उपलब्ध आहेत त्याच रंगांमधून तुम्ही वेगळा रंग घरीच तयार करू शकता…
Web Title: Diwali 2024 some cool useful rangoli tricks and hacks you must follow asp