-
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याला ग्रहांचा राजा मानले जाते. सूर्याचे प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन होते. तसेच वेळोवेळी सूर्याचे नक्षत्र परिवर्तनदेखील होते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कुंडलीत सूर्य शुभ असेल, तर व्यक्तीला आयुष्यात आत्मविश्वास, यश, मान-सन्मान, पैसा, पद यांसारख्या बऱ्याच गोष्टी प्राप्त होतात. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सूर्य स्वाती नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे ज्याचा शुभ प्रभाव १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
पंचांगानुसार, सूर्याने २४ ऑक्टोबर रोजी सकाळी १२ वाजून ५२ मिनिटांनी स्वाती नक्षत्रामध्ये प्रवेश केला असून तो ६ नोव्हेंबरपर्यंत या नक्षत्रात राहील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
स्वाती नक्षत्राचा स्वामी राहू ग्रह आहे. सूर्याचा राहूच्या नक्षत्रातील प्रवेश काही राशींच्या व्यक्तींना अत्यंत फायदेशीर ठरेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मिथुन राशींच्या व्यक्तींना सूर्याचे नक्षत्र परिवर्तन खूप अनुकूल फळ देणारे ठरेल. या काळात भाग्य तुमच्या बाजूने असेल. तुमचे प्रेम संबंध मजबूत होतील. या काळात समस्यांपासून सुटका होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सूर्याचे नक्षत्र परिवर्तन धनु राशींच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी सूर्याचे नक्षत्र परिवर्तन खूप अनुकूल सिद्ध होईल. मेहनत केलेल्या कामात हवे तसे यश मिळवता येईल. आर्थिक परिस्थिती उत्तम होईल. करिअर आणि व्यवसायात मनासारखे यश प्रस्थापित कराल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
सूर्य देणार भरपूर पैसा; स्वाती नक्षत्रातील प्रवेशाने ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य
Surya Enter Swati Nakshatra: स्वाती नक्षत्राचा स्वामी राहू ग्रह आहे. सूर्याचा राहूच्या नक्षत्रातील प्रवेश काही राशींच्या व्यक्तींना अत्यंत फायदेशीर ठरेल.
Web Title: Surya will give a lot of money by entering swati nakshatra the fortune of this rashi will shine sap