-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते; ज्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव १२ राशींपैकी काही राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रात गुरू ग्रहाला ज्ञान, सौभाग्य आणि सुख-समृद्धीचा कारक ग्रह मानले जाते. गुरु सध्या वृषभ राशीत विराजमान असून तो मेपर्यंत याच राशी राहणार आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तसेच तो १५ मे २०२५ रोजी वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करेल. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये कर्क राशीत आणि वर्षाच्या शेवटी पुन्हा मिथुन राशीत प्रवेश करेल. २०२५ मधील तीन वेळा गुरूचे हे राशी परिवर्तन काही राशींसाठी लाभदायी सिद्ध होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
पंचांगानुसार, गुरू १५ मे २०२५ रोजी वृषभ राशीतून सकाळी २ वाजून ३० मिनिटांनी मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. तसेच तो १८ ऑक्टोबर २०२५ रोजी ९ वाजून ३९ मिनिटांनी कर्क राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर गुरू वक्री अवस्थेमध्ये डिसेंबर रोजी रात्री ८ वाजून ३९ मिनिटांनी प्रवेश करणार आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
गुरू ग्रहाच्या राशी परिवर्तनाने वृषभ राशीच्या व्यक्तींना आयुष्यात अनेक चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. या काळात समाजात मान-सन्मान, पद-प्रतिष्ठा वाढेल. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी गुरूचे राशी परिवर्तन खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
गुरू ग्रहाच्या राशी परिवर्तनाने सिंह राशीच्या व्यक्तींना अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. अचानक धनलाभ होतील, आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
२०२५ मध्ये गुरूचे तीन वेळा होणार राशी परिवर्तन; ‘या’ ३ राशीच्या व्यक्तींची होणार चांदी
Guru Gochar 2025: गुरू १५ मे २०२५ रोजी वृषभ राशीतून सकाळी २ वाजून ३० मिनिटांनी मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. तसेच तो १८ ऑक्टोबर २०२५ रोजी ९ वाजून ३९ मिनिटांनी कर्क राशीत प्रवेश करणार आहे.
Web Title: Guru gochar 25 jupiter will change the sign three times 3 zodiac persons will be earn money and respect sap