-
आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असलेली मोड आलेली मेथी आहारात प्रमुख स्थानी आहे. जिंदाल नेचरक्योर इन्स्टिट्यूटच्या मुख्य आहारतज्ञ सुषमा पीएस यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य: Freepik)
-
मोड आलेली मेथी हे आवश्यक जीवनसत्त्व, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सच्या केंद्रस्थानी आहेत. तसेच हे व्हिटॅमिन-सी, ए ने समृद्ध असून जे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. (फोटो सौजन्य: Freepik)
-
मोड आलेल्या मेथीमधील उच्च फायबर सामग्री पचनास मदत करून आणि कफ रोखून निरोगी पचन तंत्राला चालना देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
मोड आलेली मेथी रक्तातील साखर नियंत्रित ठेवते. हे मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी फायदेशीर आहे. (फोटो सौजन्य: Freepik)
-
मोड आलेली मेथी अँटिऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी कंपाऊंडने परिपूर्ण असतात, जे संपूर्ण शरीरातील सूज कमी करण्यास फायदेशीर आणि विविध आरोग्य समस्या कमी करण्यासाठी योगदान ठरू शकते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
अंकुरीत मेथी कोलेस्ट्रॉलची क्षमता कमी करण्यास फायदेशीर ठरू शकते, जे हृदयविकारापासून बचाव करतात. तसेच कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असल्यामुळे मोड आलेली मेथी परिपूर्णतेची भावना वाढवू शकते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
मोड आलेली मेथी शरीरात संरचना असलेले व्हिटॅमिन-सी तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते, मोड आलेल्या मेथीमध्ये फायटोएस्ट्रोजन गुण असतात, जे हार्मोनल समतोल राखतात. मोड आलेली मेथी हे कॅल्शियम आणि इतर खनिजांचे साधन आहेत, जे मजबूत हाडांसाठी फायदेशीर आहे. (फोटो सौजन्य: Freepik)
-
मोड आलेली मेथी खाण्याचे अनेक फायदे असले तरी मोड आलेली मेथी प्रत्येकासाठी फायदेशीर असू शकत नाही.आहारातील कोणताही बदल करण्यापूर्वी आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या. (फोटो सौजन्य: Freepik)
-
गर्भवती महिलांनी तसेच ॲलर्जी असणाऱ्या व्यक्तींनीही मोड आलेल्या मेथीचे सेवन करण्यापूर्वी काळजी घ्यावी. याच्या अतिसेवनाने पोट फुगणे आणि गॅसची समस्या उद्भवू शकते. (फोटो सौजन्य: Freepik)
मोड आलेली मेथी आरोग्यासाठी फायदेशीर; पण किती प्रमाणात खावी? तज्ज्ञांचे मत जाणून घ्या
Methi sprouts: मोड आलेली मेथी हे आवश्यक जीवनसत्त्व, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सच्या केंद्रस्थानी आहेत. तसेच हे व्हिटॅमिन-सी, ए ने समृद्ध असून जे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी फायदेशीर आहे.
Web Title: Decayed fenugreek is beneficial for health but how much to eat sap