• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. heres how long you can safely store rice in the fridge snk

फ्रिजमध्ये किती दिवस भात ठेवू शकतो? तज्ज्ञांनी केला खुलासा

How long you can safely store rice in the fridge : बरेच लोक उरलेला भात रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतात आणि त्याचे शेल्फ लाइफ वाढवतात आणि अन्न वाया जाऊ नये याचा प्रयत्न करतात पण….

Updated: November 3, 2024 03:17 IST
Follow Us
  •  Heres how long you can safely store rice in the fridge
    1/10

    How ti store rice in the fridge भात हा आपल्या रोजच्या जेवणातील महत्त्वाचा भाग आहे. अनेक लोकांचे जेवण भात खाल्ल्याशिवाय पूर्ण होत नाही. अनेक लोक रात्रीच्या जेवणातील उरलेला भात दुसर्‍या दिवशी खातात. अशावेळी भाताचा ताजेपणा आणि सुरक्षितता राखण्यासाठी तो योग्यरित्या साठवणे आवश्यक आहे. बरेच लोक उरलेला भात रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतात आणि त्याचे शेल्फ लाइफ वाढवतात आणि अन्न वाया जाऊ नये याचा प्रयत्न करतात. पण, भात सुरक्षितपणे साठवण्यासाठी योग्य कालावधी समजून घेतल्यास अन्नजन्य आजार टाळता येतात आणि भात चवदार आणि पौष्टिक राहील याची खात्री करता येते.

  • 2/10

    याबाबत माहिती देताना कन्सल्टंट डायटिशिअन आणि आहारतज्ज्ञ कनिक्का मल्होत्रा यांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, “भात चांगल्या परिस्थितीत चार ते सहा दिवस रेफ्रिजरेटरमध्ये सुरक्षितपणे साठवला जाऊ शकतो. पण, या कालावधीवर विविध घटक प्रभाव टाकू शकतात.

  • 3/10

    मल्होत्रा यांनी सांगितले की, भात रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्यापूर्वी लवकर थंड केला पाहिजे. खोलीच्या तापमानामध्ये भात जास्त वेळ (दोन तासांपेक्षा जास्त) ठेवू नये, कारण ‘temperature danger zone’ म्हणजेच दोन तासांपेक्षा जास्त वेळ भात बाहेर राहिल्यास त्यात जीवाणू वाढू शकतात. भात साठवण्यासाठी उथळ भांडे वापरल्याने ते जलद थंड होण्यास मदत होते आणि बॅक्टेरियाच्या वाढीचा धोका कमी होतो.”

  • 4/10

    भात साठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या डब्यांच्या प्रकाराबाबत द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना मल्होत्रा ​​यांनी सांगितले की, “हवाबंद डबा वापरू शकता, ज्यामुळे आर्द्रतेचा संपर्क टाळता येतो; त्यामुळे भात जास्त काळ टिकवून ठेवण्यास मदत होते. याउलट, एका मोठ्या खोल डब्यात भात ठेवल्यास तो जास्त काळ गरम राहू शकतो, ज्यामुळे भात खराब होण्याचा धोका वाढतो.

  • 5/10

    रेफ्रिजरेटरने ४०°F (4°C) किंवा त्याहून कमी तापमानदेखील राखले पाहिजे. जर रेफ्रिजरेटर पुरेसे थंड नसेल तर भात लवकर खराब होऊ शकतो. भाताची सुरुवातीची गुणवत्ता आणि तो कसा शिजवला गेला याच्या शेल्फ लाईफ म्हणजे किती काळ भात ताजा राहू शकतो यावर परिणाम होऊ शकतो. योग्य प्रकारे शिजवलेला आणि योग्यरित्या साठवलेला भात हा चुकीच्या पद्धतीने शिजवलेल्या भातापेक्षा जास्त काळ टिकतो.

  • 6/10

    “अन्नामुळे संसर्ग होणाऱ्या आजारांचा (foodborne illnesses) जास्त धोका असलेल्या व्यक्तींसाठी (जसे की वृद्ध, गर्भवती स्त्रिया किंवा ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे), अतिरिक्त सुरक्षिततेसाठी दोन ते चार दिवसांत शिजवलेला भात खाण्याचा सल्ला दिला जातो,” असे मल्होत्रा ​​ठामपणे सांगतात.

  • 7/10

    भात खराब झाला आहे किंवा खाण्यासाठी सुरक्षित नाही हे दर्शवणारी विशिष्ट चिन्हे ((Specific signs that indicate cooked rice has gone bad or is no longer safe to eat))
    मल्होत्रा ​​जोर देऊन सांगतात की, शिफारस केलेल्या कालावधीत म्हणजेच चार ते सहा दिवसामध्ये रेफ्रिजेटरमध्ये ठेवूनही खराब होऊ शकतो. भात खराब झाला आहे हे ओळखण्याची अनेक चिन्हे दिसतात ज्यावरून तो खाण्यासाठी सुरक्षित आहे की नाही ते समजते. भाताचा आंबट वास हे भात खराब होण्याचे प्राथमिक चिन्ह आहे, जे बॅक्टेरियाच्या वाढीस सूचित करते.

  • 8/10

    याव्यतिरिक्त, जर भाताने एक पातळ पोत विकसित केला असेल, तर हे ओलावा टिकवून ठेवण्याचे आणि संभाव्य किण्वन दर्शवते, ज्यामुळे ते वापरणे असुरक्षित होते. हिरवे, निळे किंवा काळे ठिपके यांसारखी चिन्हे ही भात ताबडतोब टाकून देण्याची स्पष्ट चिन्हे आहेत.
    मल्होत्रा ​​सांगतात की, “जरी शिजवलेला भात सामान्य दिसत असला, तरी तो अयोग्यरित्या साठवला गेला असेल किंवा खोलीच्या तापमानात जास्त काळ ठेवला गेला असेल, तर ते बॅसिलस सेरेयससारखे हानिकारक जीवाणू निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे अन्न विषबाधा होऊ शकते.”

  • 9/10

    शिजवलेला भात थंड करण्यासाठी आणि साठवण्यासाठी सर्वोत्तम पद्धती (Best practices for cooling and storing cooked rice)
    शिजवलेल्या भाताचा ताजेपणा वाढवण्यासाठी आणि बॅक्टेरियाच्या वाढीचा धोका कमी करण्यासाठी भात थंड करण्याच्या आणि साठवण्याच्या या सर्वोत्तम पद्धतींचे पालन करा :
    शिजवल्यानंतर भात खोलीच्या तापमानाला १-२ तासांत थंड होऊ द्या. थंड होण्यासाठी भात व्यवस्थित मोकळा करा आणि त्याला उथळ भांड्यामध्ये पसरवा. ही पद्धत पृष्ठभागाचे क्षेत्रफळ वाढवते आणि भात जलद थंड होण्यास मदत करते.
    भात थंड झाल्यावर रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. गरम भात थेट फ्रिजमध्ये न ठेवणे महत्त्वाचे आहे, कारण यामुळे आसपासच्या पदार्थांचे तापमान वाढू शकते आणि बॅक्टेरियाच्या वाढीस चालना मिळते. भात शिजवल्यानंतर चार तासांच्या आत फ्रिजमध्ये ठेवण्याचे लक्ष्य ठेवा.

  • 10/10

    थंड केलेला भात हवाबंद डब्यात किंवा पुन्हा वापरता येण्याजोग्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये साठवा. हे ओलावा जमा होण्यास प्रतिबंध करते आणि जीवाणूंची निर्मिती होणे टाळते. तसेच भात फ्रिजमधील इतर पदार्थांच्या दुर्गंधीपासून वाचवते.
    साठवण्यापूर्वी भात वेगवेगळ्या डब्यांमध्ये साठवू शकता, ज्यामुळे भात पुन्हा गरम करणे अधिक सोयीचे होते आणि संपूर्ण भात अनेक वेळा पुन्हा गरम करण्याची गरजदेखील कमी होते; ज्यामुळे बॅक्टेरियाची वाढ टाळता येते
    डबा नेहमी फ्रिजमध्ये ठेवताना त्यावर तारखेसह लेबल लावा. शिजवलेला भात रेफ्रिजरेटरमध्ये ४-६ दिवसांच्या आत वापरला जावा आणि जर तुम्ही त्या कालावधीत तो खाण्याचा विचार करत नसाल, तर जास्त दिवस साठवण्यासाठी ते गोठवण्याचा विचार करा, जिथे तो १-२महिने टिकेल. ( सौजन्य – फ्रिपीक आणि मेटा AI)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Heres how long you can safely store rice in the fridge snk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.