Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. that urge to nap after lunch its stronger for women and know a reason why snk

दुपारच्या जेवणानंतर महिलांना झोपण्याची तीव्र इच्छा का होते? तज्ज्ञांनी सांगितले कारण

पुणे येथे रुबी हॉल क्लिनिकमध्ये, प्रसूती आणि स्त्रीरोग, डॉ. कोमल भादू, यांनी स्पष्ट केले की, “हार्मोन्स, मासिक पाळी आणि सामाजिक अपेक्षा यांचे गुंतागुंतीचे जाळे येथे महत्त्वाची भूमिका बजावते.”

Updated: November 4, 2024 20:41 IST
Follow Us
  • That urge to nap after lunch its stronger for women and theres a reason why
    1/15

    दुपारी ३ ते ५ ची वेळ ही अशी असते, जेव्हा आपल्या डोळ्यांवर झोप आलेली असते आणि कोणत्याच कामावर लक्ष केंद्रित होत नाही आणि अशावेळी थोड्यावेळ झोपण्याची फार इच्छा होते. बहुतेक महिलांना अशी इच्छा तीव्रतेने जाणवते.

  • 2/15

    टिकटॉक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक तरुणींनी ही तीव्र भावना जाणवत असल्याचे व्यक्त केले आहे.

  • 3/15

    मुलींना जाणवणारी ही भावना काही चुकीची नाही. संशोधनानुसार पुरुषांपेक्षा महिलांना झोपेची जास्त आवश्यकता असते. 

  • 4/15

    लॉफबरो युनिव्हर्सिटी (Loughborough University) च्या संशोधनानुसार, महिलांना पुरुषांच्या तुलनेत २० मिनिटांपेक्षा जास्त झोप आवश्यक आहे; कारण त्यानुसार आपला मेंदू काम करतो.”

  • 5/15

    पुणे येथील रुबी हॉल क्लिनिकमध्ये प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ कोमल भादू यांनी स्पष्ट केले की, “हार्मोन्स, मासिक पाळी आणि सामाजिक अपेक्षा यांचे गुंतागुंतीचे जाळे येथे महत्त्वाची भूमिका बजावते.”

  • 6/15

    यूएस, नॅशनल स्लिप फाऊंडेशनच्या संशोधनामध्ये असे दिसून आले की, दिवसभरात मध्यरात्री २ ते सकाळी ७ आणि दुपारचे २ ते ५ या दोन वेळेमध्ये व्यक्ती निद्रावस्थेत असतो;

  • 7/15

    कारण आपल्यापैकी बहुतेकजण पहिल्या टप्यात (मध्यरात्री २ ते सकाळी ७ ) गाढ झोपेत असतात आणि दुसऱ्या टप्यात (दुपारचे २ ते ५) खूप झोप येत असते.

  • 8/15

    यापैकी दुसरा टप्पा जो दुपारच्या जेवणानंतर येतो, जेव्हा पचनक्रिया आणि इन्सुलिनसारख्या घटकांमुळे आपल्या शरीरातील ऊर्जेच्या पातळीत नैसर्गिक घट जाणवते, त्यामुळे झोपेची गुंगी आल्यासारखी भावना स्त्री आणि पुरुष दोघांनाही जाणवते.

  • 9/15

    दुपारच्या जेवणानंतर येणाऱ्या गुंगीला “postprandial dip, असे म्हणतात.

  • 10/15

    ही स्थिती रक्तातील साखरेची पातळी आणि शरीराची नैसर्गिक सर्केडियन लय (circadian rhythm) यामध्ये घट झाल्यामुळे निर्माण होते. झोप येण्यामागे मेलाटोनिन (melatonin) सारखे हार्मोन्स महत्त्वाची भूमिका निभावतात.

  • 11/15

    जेवणामध्ये पचण्यास जड असे पदार्थ खाल्ल्यास, त्यांचा मेलाटोनिनसारख्या घटकांसह संयोग झाल्यास दुपारी लवकर झोपण्याची इच्छा निर्माण होते.

  • 12/15

    पण, महिलांच्या हार्मोन्समध्ये होणारे चढउतार, विशेषत: मासिक पाळीच्या दरम्यान थकवा वाढवू शकतो. 

  • 13/15

    नवी मुंबई येथील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलच्या प्रसूती आणि स्त्रीरोग डॉ. बंदिता सिन्हा यांनी स्पष्ट केले की, “मासिक पाळीच्या दरम्यान प्रोजेस्टेरॉन हा हार्मोन वाढतो, ज्याच्या प्रभावामुळे शरीर शांत होते. त्यामुळे महिलांमध्ये दुपारी झोपण्याची इच्छा अधिक तीव्र होऊ शकते

  • 14/15

    तज्ज्ञांच्या मतानुसार महिलांना झोप येण्याच्या तीव्र इच्छेचा, एकाच वेळी अनेक काम करण्याची सवय आणि मानसिक व शारीरिक झीज झाल्यामुळे असू शकतो”, असे डॉ. भादू यांनी सांगितले आहे.

  • 15/15

    महिलांना झोपण्याची अशी तीव्र इच्छा का होते, याबाबतचे संशोधन फार कमी आहे; परंतु याबाबत पुरावा देणारे किस्से पुष्कळ आहेत. मग ते सोशल मीडियावर असो किंवा आपल्या स्वत:च्या वैयक्तिक आयुष्यातील असो. (सर्व फोटो सौजन्य – फ्रिपीक)

TOPICS
मराठी बातम्याMarathi Newsलाइफस्टाइलLifestyleहेल्थ न्यूजHealth News

Web Title: That urge to nap after lunch its stronger for women and know a reason why snk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.