Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. what happens to the body when we get extremely angry snk

जेव्हा एखाद्या व्यक्तीला खूप राग येतो तेव्हा शरीरामध्ये काय बदल होतात? तज्ज्ञांकडून जाणून घ्या…

what happens to the body when angry : खूप राग आल्याने तुमचा मूड खराब होतो. त्याचबरोबर तुमच्या शारीरिक आरोग्यालाही हानी पोहोचवते

November 5, 2024 06:00 IST
Follow Us
  • what happens to the body when we get extremely angry
    1/20

    राग शरीरासाठी चांगला नाही हे सर्वांना माहीत आहे. तज्ज्ञांच्या मते, “रागाने रक्त खवळते; पण त्याचबरोबर त्याचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. 

  • 2/20

    याबाबत सहमती दर्शविताना, डॉ. रॉबर्ट जी. डीबीज यांनी एक्सवर पोस्ट शेअर करीत सांगितले, “अत्यंत जास्त राग आल्यानंतर तुमच्या कॉर्टिसोलची पातळी सामान्य होण्यासाठी सात तास लागतात;

  • 3/20

    ज्यामुळे पचन समस्या निर्माण होते, मेंदूच्या कार्यात अडथळा निर्माण होतो, डिटॉक्सिफिकेशन आणि थायरॉईड डिसफंक्शन होते. तसेच रक्तातील साखरेच्या पातळीत असंतुलन होते.

  • 4/20

    “तणावपूर्ण किंवा निराशाजनक घटनेनंतर राग येणे अगदी सामान्य गोष्ट आहे. पण, खूप राग आल्याने तुमचा मूड खराब होतो. “

  • 5/20

    “त्याचबरोबर तुमच्या शारीरिक आरोग्यालाही हानी पोहोचवते,” असे डॉ. सोनल आनंद (मानसोपचार तज्ज्ञ, वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मिरा रोड) यांनी सांगितले.

  • 6/20

    जेव्हा तुम्हाला खूप राग येतो तेव्हा तुमच्या शरीराकडून हाणामारीसदृश किंवा उसळण्यासारखा (fight or flight) प्रतिसाद (तणावामुळे शरीराकडून आपोआप केली गेलेली प्रतिक्रिया) दिला जातो. ही जीवन जगताना विकसित झालेली एक पूर्वापार प्रतिक्रियेचा एक भाग आहे.

  • 7/20

    हा प्रतिसाद मज्जासंस्थेद्वारे (autonomic nervous System), विशेषत: सिंपथेटिक ब्रांच (sympathetic branch) द्वारे आपोआप नियंत्रित केला जातो”, असे डॉ. राहुल राय कक्कर (गुरुग्राम, नारायण हॉस्पिटलचे मानसोपचार व क्लिनिकल सायकॉलॉजी, सल्लागार) यांनी सांगितले.

  • 8/20

    खूप राग आल्यानंतर नक्की काय होते ते जाणून घ्या
    डॉ. कक्कर यांनी सांगितले, “खूप राग आल्यानंतर प्रथम मेंदू धोका ओळखतो आणि ॲमिग्डाला हायपोथॅलेमसला एड्रेनालाईन आणि कॉर्टिसॉलसारखे तणाव हॉर्मोन्स सोडण्याचे संकेत देतो

  • 9/20

     हे हार्मोन्स हृदयाची गती आणि रक्तदाब वाढवतात; ज्यामुळे तुमच्या स्नायूंना अधिक रक्त पंप करून तुम्हाला पुढील कृती करण्यासाठी तयार केले जाते.

  • 10/20

    . त्यामुळे जलद श्वासोच्छ्वास घेतला जातो, तुमच्या शरीरात जास्त ऑक्सिजन पोहोचतो आणि त्यामुळे जलद ऊर्जेचा स्रोत निर्माण करण्यासाठी रक्तातील साखरेची पातळी अधिक वाढते.”

  • 11/20

    रागामुळे तुमचे स्नायू; विशेषत: मान, खांदे व जबड्यातील स्नायू ताणले जाऊ शकतात.

  • 12/20

    त्यामुळे लोकांना राग येतो तेव्हा अनेकदा व्यक्तीला स्नायू ताठरल्यासारखे (stiff) वाटतात किंवा एखादी व्यक्ती दात दाबून बोलते (दात-ओठ खाऊन बोलणे). 

  • 13/20

     या स्थितीमध्ये तुमची पचनक्रिया मंदावते आणि पचनसंस्थेला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे तुम्हाला मळमळल्यासारखे वाटू शकते किंवा पोट खराब होऊ शकते, असे डॉ. कक्कर यांनी स्पष्ट केले.

  • 14/20

    डॉ. कक्कर यांच्या मते, “दीर्घकाळ अतिराग हानिकारक असू शकतो. कालांतराने वारंवार राग येण्याने हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.

  • 15/20

    त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होऊ शकते आणि ही बाब चिंता किंवा नैराश्याला कारणीभूत ठरू शकते.”

  • 16/20

    डॉ. आनंद यांनी डॉ. कक्कर यांच्या मतावर सहमती दर्शवीत सांगितले, “रागामुळे निराशा, चिडचिड, अपराधीपणा, प्रतिकार करणे (agitation), दुःख, राग व अतिविचार या भावना निर्माण होऊ शकतात.

  • 17/20

    त्यामुळे एखाद्याच्या मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो; ज्यामुळे नैराश्य, तणाव व चिंता निर्माण होते. 

  • 18/20

    तुम्हाला एखाद्या विशिष्ट गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे किंवा स्पष्टपणे विचार करणे कठीण होऊ शकते. 

  • 19/20

    . म्हणूनच तुमच्या रागाची पातळी नियंत्रित करणे आणि तणावपूर्ण परिस्थितीत शांत राहणे महत्त्वाचे आहे,” असे डॉ. आनंद म्हणाले.

  • 20/20

    “दीर्घ श्वासोच्छ्वास किंवा माइंडफुलनेस यांसारख्या तंत्राद्वारे रागावर नियंत्रण ठेवण्यास शिकल्यामुळे हे त्रासदायक शारीरिक परिणाम कमी होण्यास मदत होते,” असे डॉ. कक्कर यांनी स्पष्ट केले. (सर्व फोटो सौजन्य – फ्रिपीक)

TOPICS
पुणे न्यूजPune Newsमराठी बातम्याMarathi Newsलाइफस्टाइलLifestyle

Web Title: What happens to the body when we get extremely angry snk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.