-
आजी आणि आईचे ते जुने घरगुती उपाय म्हणजे त्वचा निरोगी राहण्याची गॅरंटीच जणू. त्यांच्या उपायांच्या बटव्यामध्ये स्वयंपाकघरातील सर्व सामग्रीपैकीच घटक असत आणि त्यामुळे कधीही त्वचेचे नुकसान झाल्याचे ज्ञात नाही.
-
केसांच्या आरोग्यासाठी कडीपत्ता तर ऍक्नेच्या (acne) त्रासातून मुक्तीसाठी कच्च आले वापरले जाते. पण सध्या सोशल मीडियाने (social media) लक्ष वेधून घेतले आहे ते केसरच्या गुणधर्मांमुळे त्वचेच्या आरोग्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध उपायांनी.
-
असे सांगितले जाते की, केसरीचा भाव प्रति किलो तीन लाखांच्या घरात जाऊन पोहोचला आहे.(1 pound) १ पाउंड (१ पाउंड = ४५३.६ ग्राम ) (453.6 grams)केसरच्या उत्पादनासाठी ७५,००० जाफरान फुलांचा(75000 Crocus Sativus Flower) वापर केला जातो.
-
इंडिया टुडेशी (India Today)संवाद साधताना नवी दिल्लीमधील अवीव एस्थेटिक्सच्या (Aviv Aesthetics New Delhi) कर्त्याधर्त्या (Founder) डॉ. सृष्टी (Dr. Srushti)यांनी केसरचा उपयोग त्वचेच्या कुठल्या समस्यांसाठी होऊ शकतो याची सविस्तर माहिती देत सांगितले, “केसरचा उपयोग त्वचेचा रंग उजळवण्यासाठी, त्वचेची जळजळ कमी करण्यासाठी, तसेच ऍक्नेशी सामना करण्यासाठी होतो. इतकेच नाही, तर त्वचेचा ओलावा आणि तेलकटपणा(oily skin) दूर करण्यासाठीदेखील होतो.
-
बऱ्याच ब्युटी प्रॉडक्ट्सचा यूएसपी (Beauty products USP) केसरचा समावेश असून, त्याच्या गुणधर्मांना मुख्य आकर्षण म्हणून समोर ठेवले जाते.
-
तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार केसर यू व्ही रेडिएशनपासून (UV Radiation) आपले रक्षण करते.
कोलगान (Collagen) आणि हायलोरोनिक ऍसिडला (Hyluronic Acid) उत्तेजित करते. उजळ, निरोगी आणि इव्हन टोन (Even tone) करण्यात मदत करते. -
सुके केसर आणि केसर तेल यांच्या उत्पादन आणि वापरात बराच फरक आहे.
सुके केसर आणि केसर तेल त्वचेला उजळ रूप देण्यात, त्वचेची जळजळ कमी करण्यात आणि ऍक्नेशी लढण्यात मदत करतेच; परंतु केसर तेलामध्ये अर्क जास्त वरील उपयोगांसह केसर तेल हैदरशन आणि शोषणातही मदत करते. -
सुके केसर चेहऱ्याच्या मास्कसाठी (Face Mask) उपयोगी पडते.
-
केसराचा वापर रोजच्या जीवनात कसा कराल? जर तुम्हाला केसरचा वापर स्किन केअरसाठी करायचा असेल, तर सिरम (Serum), तेल किंवा फेस मास्कमधून करणे फायद्याचे ठरेल.
-
त्वचा उजळता करण्यासाठी केसर दही (curd) व हळदीसह (turmeric) वापरता येईल. तसेच ऍक्नेशी लढण्यासाठी केसर आणि मधाचा(honey) वापर करणे अत्यंत फायदेशीर ठरेल.
मुलायम त्वचेसाठी गुलाबजल (Rosewater)आणि केसर यांचा उपयोग अत्यंत उपयोगी आहे. -
या सोप्या पद्धतीच्या उपायांचे पालन केले, तर त्वचेचे सौंदर्य खुलेल आणि त्वचेला कोणत्याही समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.
-
(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)
Kesar Skin Care Benefits: तीन लाखांचे केसर करेल तुमच्या त्वचेच्या सर्व समस्या दूर?
Benefits of the most expensive spice kesar for all skincare problems
Web Title: Will kesar worth 3 lakhs solve your skincare problems benefits of kesar for better skincare