-
कच्चे दूध किंवा पाश्चराइज्ड दूध आपल्या दैनंदिन जीवनाचा एक आवश्यक भाग आहे. पण, तुम्ही कधी हा विचार केला आहे का की, दोन्हीपैकी कोणते दूध पिणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे? आम्ही याबाबत तज्ज्ञांना प्रश्न विचारला. (फोटो सौजन्य: Freepik)
-
‘फिसिको डाएट अॅण्ड एस्थेटिक क्लिनिक’च्या संस्थापक व आहारतज्ज्ञ विधी चावला यांनी सांगितले, “दूध पिण्यामध्ये कच्चे दूध विरुद्ध पाश्चराइज्ड दूध हा अनेक वर्षांपासून वाद आहे. दुधावर प्रक्रिया करण्याची पद्धत, पौष्टिक सामग्री व सुरक्षितता ही त्यामागील कारणे आहेत.” (फोटो सौजन्य: Freepik)
-
कच्चे म्हणजे गाई, शेळ्या किंवा मेंढ्यांचे प्रक्रिया न केलेले दूध. “त्यामध्ये प्रथिने, चरबी, कॅल्शियम व खनिजे भरपूर प्रमाणात असतात. त्यात फायदेशीर एन्झाइम्स व प्रो-बायोटिक्सदेखील असतात,” असे चावला म्हणाल्या. (फोटो सौजन्य: Freepik)
-
बऱ्याच लोकांना असे आढळते की, कच्चे दूध पाश्चराइज्ड दुधापेक्षा अधिक समृद्ध, मलईदार चवीचे असते, जे त्याच्या प्रक्रिया न केलेल्या स्वरूपाचा दावा करते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
कच्च्या दुधात लॅक्टोजसारखे एंझाइम्स असतात; जे लॅक्टोज पचविण्यास मदत करतात. त्यात नैसर्गिक प्रो-बायोटिक्सदेखील असतात. (फोटो सौजन्य: Freepik)
-
चावला यांच्या मते, कच्च्या दुधामुळे आरोग्याच्या बाबतीत काही धोके होऊ शकतात. त्यात साल्मोनेला, ई. कोलाय व लिस्टरिया यांसारख्या रोगजनक जीवाणूंचा समावेश होतो. (फोटो सौजन्य: Freepik)
-
“या जीवाणूंमुळे अन्नजन्य आजार होऊ शकतात, जे गंभीर किंवा जीवघेणेदेखील असू शकतात. विशेषत: गर्भवती महिला, लहान मुले, वृद्ध आणि कमकुवत रोगप्रतिकार शक्ती असणाऱ्यांना होणाऱ्या कच्च्या दुधाशी संबंधित आजारांच्या लक्षणांमध्ये मळमळ, उलट्या, जुलाब व पोटदुखी यांचा समावेश असू शकतो,” असे चावला म्हणाल्या. (फोटो सौजन्य: Freepik)
-
पाश्चराइज्ड दुधातील जीवाणू नष्ट करण्यासाठी ते गरम केले जाते आणि त्यामध्ये दुधाची मूळ चव आणि पोषक घटक टिकवून ठेवले जातात. “पाश्चराइज्ड दुधामुळे हानिकारक जीवाणू नष्ट होतात ते दूध व्हिटॅमिन-बीसारख्या काही उष्मा-संवेदनशील पोषक घटकांची पातळीदेखील कमी करू शकते. पाश्चराइज्ड दूध कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचा चांगला स्रोत आहे,” असे चावला म्हणाल्या. (फोटो सौजन्य: Freepik)
-
पाश्चराइज्ड दूध वापरण्याचा मुख्य फायदा म्हणजे त्याची सुरक्षितता. “त्या अंतर्गत पॅथोजेनिक सूक्ष्म जीव नष्ट केले जातात; ज्यामुळे अन्नजन्य आजाराचा धोका कमी होऊ शकतो,” असे चावला म्हणाल्या. (फोटो सौजन्य: Freepik)
कच्चे की पाश्चराइज्ड यापैकी कोणते दूध अधिक फायदेशीर? तज्ज्ञ काय सांगतात…
Raw Milk and Pasteurised Milk: कच्चे दूध किंवा पाश्चराइज्ड दूध आपल्या दैनंदिन जीवनाचा एक आवश्यक भाग आहे. पण, तुम्ही कधी हा विचार केला आहे का की, दोन्हीपैकी कोणते दूध पिणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे?
Web Title: Which is more beneficial raw or pasteurized milk what experts say sap