• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. how to make makhmal puri this wedding season you can make this recipe for rukhwat read marathi recipe asp

कोल्हापूर स्पेशल पाकातली ‘मखमल पुरी’ कधी खाल्ली आहे का? मग वाचा ‘ही’ सोपी रेसिपी

How To Make Makhmal Puri : लग्नासाठी कपड्यांची, दागिन्यांची तयारी तर होतेच, पण या सगळ्या तयारीतली कल्पक गोष्ट म्हणजे रुखवत. रुखवतीला आपण विविध शोभेच्या वस्तू ठेवतो आणि काही गोड पदार्थही ठेवतो. तर तुम्हाला लग्नात रुखवतीत ठेवायला एखादा गोड पदार्थ करायचा असेल तर तुम्ही कोल्हापूरची…

November 14, 2024 22:01 IST
Follow Us
  • How To Make Home Made Makhmal Puri
    1/9

    तुळशीच्या लग्नानंतर शुभ मुहूर्तांना सुरुवात होते. मग लगबग सुरु होते ती लग्नाची. लग्नासाठी कपड्यांची, दागिन्यांची तयारी तर होतेच, पण या सगळ्या तयारीतली कल्पक गोष्ट म्हणजे रुखवत. रुखवतीला आपण विविध शोभेच्या वस्तू ठेवतो आणि काही गोड पदार्थही ठेवतो. तर तुम्हाला लग्नात रुखवतीत ठेवायला एखादा गोड पदार्थ करायचा असेल तर तुम्ही कोल्हापूरची स्पेशल ‘मखमल पुरी’ बनवू शकता. मखमल पुरी रेसिपी! (फोटो सौजन्य : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 2/9

    हा पदार्थ बनवण्यासाठी तुम्हाला अर्धा किलो मैदा, दोन वाटी बारीक किसलेलं खोबर, अर्धा किलो साखर, फूड कलर (पिठानुसार – अर्धा चमचा), तेल, मीठ, वेलची पूड (अर्धा चमचा) इत्यादी. मखमल पुरी रेसिपी! (फोटो सौजन्य : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 3/9

    परातीत मैदा घेऊन गरम करून घेतलेलं तेल त्यामध्ये टाका आणि तेल टाकल्यावर मिश्रण एकजीव करून घ्या. त्यानंतर पीठ मळून घ्या व चवीनुसार थोडं मीठ घाला.मखमल पुरी रेसिपी! (फोटो सौजन्य : Freepik)

  • 4/9

    सगळ्यात आधी अर्धा किलो मैदा चाळणीमधून चाळून घ्या. गॅसवर एका भांड्यात अर्धी वाटी तेल गरम करून घ्या. मखमल पुरी रेसिपी! (फोटो सौजन्य: @Freepik )

  • 5/9

    चमचाभर पाण्यात फूड कलर (Food Colour) मिक्स करा आणि मग ते पिठात टाकून आणि मळून घ्या. त्यानंतर १५ मिनिटे किंवा अर्धा तास पीठ झाकून ठेवा. (फूड कलरमध्ये तुम्ही भगवा किंवा पिवळा रंग वापरू शकता). पीठ मळून झाल्यावर सगळ्यात आधी पाक तयार करून घ्या. (फोटो सौजन्य : Freepik)

  • 6/9

    गॅसवर टोप ठेवून त्यात दीड ग्लास पाणी, दोन वाटी साखर टाकून पाक तयार होईपर्यंत चमच्याने हलवत रहावे. (टीप : जेवढा पाक चांगला होईल तेवढ्या पुऱ्या चविष्ट लागतात) पाक तयार झाला आहे का, तपासावे आणि गॅस बंद करावा आणि वरून वेलची पूड टाकावी. (फोटो सौजन्य : @Freepik)

  • 7/9

    त्यानंतर पिठाचे गोळे करून छोट्या-छोट्या पुऱ्या लाटून घ्या. नंतर गॅसवर कढईत तेल गरम करायला ठेवा आणि पुरी तळायला सुरुवात करा. (फोटो सौजन्य : लोकसत्ता डॉट कॉम)

  • 8/9

    तळताना पुरी जेव्हा नरम असते, तेव्हा चमच्याच्या सहाय्याने दुमडून घ्या आणि नंतर पुरी दोन्ही बाजूने कडक तळून झाल्यावर झाऱ्याच्या सहाय्याने तेलातून बाहेर काढा. (फोटो सौजन्य : लोकसत्ता डॉट कॉम)

  • 9/9

    सगळ्या पुऱ्या तळून झाल्यावर पाकात बुडवून घ्या आणि त्यावर लगेच बारीक किसलेलं खोबरं आणि साखर घाला. अशाप्रकारे तुमची ‘मखमल पुरी’ तयार. (फोटो सौजन्य : लोकसत्ता डॉट कॉम)

TOPICS
इंडियन फूडIndian Foodफास्ट फूडFast FoodफूडFoodरेसिपीRecipeहेल्दी फूडHealthy Food

Web Title: How to make makhmal puri this wedding season you can make this recipe for rukhwat read marathi recipe asp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.