-
लिंबामध्ये विविध जीवनसत्त्वे असतात. त्यामुळे लिंबू शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
-
रोगप्रतिकार शक्तीमध्ये वाढ, त्वचा उजळ करणे, पचनशक्तीमध्ये सुधारणा यांसारखे अनेक फायदे लिंबामध्ये दडलेले आहेत.
-
पण, याच उपयुक्त लिंबाचे काही गोष्टींसह सेवन केले, तर विरोधी गुणधर्मांमुळे जीवाला धोका होऊ शकतो. मग धोकादायक ठरू शकणाऱ्या ‘या’ पाच गोष्टी कोणत्या ते पाहू :
-
लिंबू आणि दूध- दुधापासून पनीर किंवा चीज बनवायचे असेल, तर बऱ्याचदा आपण दूध फाडण्यासाठी लिंबाचा वापर करतो. लिंबामध्ये सायट्रिक अॅसिड असल्यामुळे दूध फाटायला मदत होते. याच प्रकारे जर दूध आणि लिंबाचे सेवन एकत्र केले, तर पचनक्रियेत बिघाड होण्याची दाट शक्यता आहे. पोटात गॅस निर्माण होण्याच्या रूपाने, शरीराकडून नकारात्मक प्रतिक्रिया मिळू शकते.
-
लिंबू आणि मच्छी- लिंबासह मच्छीचे सेवन केल्यास मच्छीमधील पोषक घटक कमी होतात आणि लिंबामधील सायट्रिक अॅसिड मच्छीमधील प्रोटीन पचवण्यात अडचण आणू शकते.
-
लिंबू आणि दही- दह्यासोबत लिंबाचे सेवन केल्यास अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. लिंबामध्ये समाविष्ट असलेले अॅसिड दह्यामधल्या चांगल्या जीवाणूंचा नाश करू शकते.
-
लिंबू आणि पपई – पपईमध्ये पपेन नावाच्या एन्झाइमचा समावेश आहे. त्यामुळे पपई जर लिंबाबरोबर खाल्ला, तर जठरासंबंधीची समस्या उत्पन्न होऊ शकते. मग अपचन, पोटदुखी व उलटीचा त्रास होऊ शकतो.
-
लिंबू आणि अंडे- अंड्यासह लिंबाचे सेवन केल्यास अपचन, पोटात जळजळ व अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो.
-
(सर्व फोटो सौजन्य; पेक्सएल्स )
धोकादायक!! या पाच गोष्टींसोबत कधीही करू नये लिंबाचे सेवन
पदार्थाची चविष्टता वाढविणारा लिंबू काही गोष्टींसह खाणं हानिकारक का?
Web Title: 5 things to avoid eating along with lemon which can affect your body pyd 04