-
मूगामध्ये असलेले फायबर अन्न पचनास मदत करतात. म्हणून अनेक गृहिणी याचे वेगवेगळे पदार्थ बनवून पाहतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तुम्ही आतापर्यंत मुगाची भाजी, मुगाची भजी, मुगाची उसळ, मूग सॅलड, मूग चिला आदी विविध पदार्थ बनवले असतील. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पण, आज आपण मुगाचे बिरडे कसे बनवायचं हे पाहणार आहोत.(फोटो सौजन्य: @Freepik)
-
एक वाटी हिरवे मूग, एक वाटी चिरलेला कांदा, राई, जिरे, कडीपत्ता, खोबरं (ओलं किंवा सुखं), हिंग, तेल, कोथिंबीर इत्यादी. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
कृतीकडे वळण्यापूर्वी सकाळी मूग (दहा तास) भिजवत ठेवा.भिजवून झाल्यानंतर ते सुती कपड्यात बांधून ठेवणे. दुसऱ्या दिवशी सकाळी मोड आलेल्या मूगाचे साल काढून घेणे.(फोटो सौजन्य: @Freepik)
-
गॅसवर कढई ठेवा. तेल घ्या त्यात राई, जिरे, हिंग, कडीपत्ता, कांदा, तिखट, हळद, मीठ, मसाला घाला. नंतर त्यात मूग घाला आणि परतवून घ्या. जेवढा तुम्हाला सार बनवून घ्यायचा आहे तेवढं त्यात पाणी घाला.(फोटो सौजन्य: @Freepik)
-
मूग शिजल्यानंतर त्यातले थोडे मूग, खोबरं, कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घ्या.बारीक केलेलं मिश्रण, बिरड्यामध्ये घालणे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
नंतर त्यात चवीपुरता गूळ घाला आणि व्यवस्थित शिजवून घ्या.गॅस बंद करा. अशाप्रकारे तुमचे मूगाचे बिरडे तयार. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तुम्ही मूगाचे बिरडे तांदळाची भाकरी, पोळी, भाताबरोबरही खाऊ शकता. (फोटो सौजन्य: @Freepik)
पौष्टिक, रसरशीत हिरव्या मुगाचे बिरडे कधी खाल्ले आहेत का? मग ‘ही’ सोपी रेसिपी नक्की वाचा
how to make Moogache Birde : तुम्ही आतापर्यंत मुगाची भाजी, मुगाची भजी, मुगाची उसळ, मूग सॅलड, मूग चिला आदी विविध पदार्थ बनवले असतील.पण, आज आपण मुगाचे बिरडे कसे बनवायचं हे पाहणार आहोत
Web Title: Moogache birde ingredients and how to make read recipe in marathi asp