-
ज्योतिषशास्त्रात ग्रहांचा सेनापती असलेल्या मंगळ ग्रहाला खूप खास मानले जाते. इतर ग्रहांप्रमाणे मंगळदेखील निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन करतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्याचा शुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर विविध प्रकारे पाहायला मिळेल. तसेच शनी देखील अडीच वर्षातून एकदा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ सध्या कर्क राशीमध्ये विराजमान असून शनी त्याच्या मूळ त्रिकोण राशी असलेल्या कुंभ राशीत विराजमान आहे. शनी आणि मंगळ एकमेकांपासून सहाव्या आणि आठव्या घरात उपस्थित आहेत. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्यामुळे षडाष्टक योग निर्माण होत आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये हा राजयोग खूप खास मानला जातो. या योगाच्या प्रभावाने काही राशींच्या व्यक्तींना शुभ प्रभाव पाहायला मिळेल.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मेष राशीच्या व्यक्तींसाठी षडाष्टक राजयोग खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण होतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती उत्तम राहून, कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तूळ राशीच्या व्यक्तींसाठी हा षडाष्टक राजयोग खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुम्हाला विशेष लाभ पाहायला मिळेल. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. घरात सुख, शांती नांदेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कुंभ राशीच्या व्यक्तींना षडाष्टक राजयोगामुळे सकारात्मक बदल पाहायला मिळतील. या काळात तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. नव्या वस्तू खरेदी कराल. नोकरीत प्रमोशन मिळेल. मुलांकडून आनंदी वार्ता येतील. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप – सदर लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
शनी-मंगळ देणार पैसाच पैसा; षडाष्टक राजयोगाच्या शुभ प्रभावाने ‘या’ तीन राशींना होणार आकस्मिक धनलाभ
Mangal gochar 2024: ज्योतिषशास्त्रामध्ये हा राजयोग खूप खास मानला जातो. या योगाच्या प्रभावाने काही राशींच्या व्यक्तींना शुभ प्रभाव पाहायला मिळेल.
Web Title: Shani mars create shadashtak rajyoga these three zodiac signs will get sudden wealth sap