Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. common lifting mistakes and how to avoid them read some tips and tricks by the doctor asp

जड वस्तू उचलताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत? वाचा डॉक्टरांनी सुचवलेले ‘हे’ उपाय

Proper Lifting Technique : एखादी जड वस्तू उचलण्याची प्रॉपर टेक्निक केवळ जिमच्या उत्साही लोकांसाठी नाही; तर जड बॉक्स उचलणे, फर्निचर हलवणे, किराणा सामान घेऊन जाताना सुद्धा या टिप्सची गरज भासू शकते…

November 28, 2024 19:34 IST
Follow Us
  • Lifting safely with pre existing conditions
    1/9

    आपण सर्वांनी ‘आपला पाठीचा उपयोग न करता पायांच्या जोरावर वजन उचलावे’ हे वाक्य अनेकदा ऐकलं असेल, पण आपल्यापैकी किती जण या सल्ल्याचे पालन करतात? कोणीच नाही… तर एखादी जड वस्तू उचलण्याची प्रॉपर टेक्निक केवळ जिमच्या उत्साही लोकांसाठी नाही; तर जड बॉक्स उचलणे, फर्निचर हलवणे, किराणा सामान घेऊन जाताना सुद्धा या टिप्सची गरज भासू शकते. तर याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने डॉक्टरांशी चर्चा केली. (फोटो सौजन्य : @Freepik)

  • 2/9

    एमबीबीएस, एमडी, जनरल मेडिसिनच्या डॉक्टर पल्लेटी शिवा कार्तिक रेड्डी म्हणाल्या की, एखादी वस्तू योग्य प्रकारे उचलण्याचे तंत्र समजून, मुख्य स्नायूंना बळकट करून सावधगिरी बाळगल्यास तुम्ही कोणत्याही शारीरिक स्थितीत असलात तरीही जड वस्तू सुरक्षितपणे उचलू शकता आणि इजा होण्याचा धोका कमी करू शकता. मग तुमची शारीरिक स्थिती काहीही असो. (फोटो सौजन्य : @Freepik)

  • 3/9

    वस्तू उचलताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत ? कंबरेतून वाकणे : यामुळे तुमच्या पाठीच्या खालच्या भागावर प्रचंड ताण येतो, ज्यामुळे संभाव्य दुखापत होऊ शकते. त्याऐवजी तुमची पाठ सरळ ठेवून तुमचे गुडघे आणि हिप्स वाकवा. तुमचे पाय एखादे सामान उचलण्याचे पॉवरहाऊस आहे असं समजा. (फोटो सौजन्य : @Freepik)

  • 4/9

    वस्तू उचलताना वळणे : एखादी वस्तू उचलताना तुम्ही वळलात की तुमच्या मणक्यावर ताण येतो, ज्यामुळे तो कमजोर होतो. पाठ वळण्याऐवजी, दिशा बदलण्यासाठी पाय वळवणे ट्राय करा. (फोटो सौजन्य : @Freepik)

  • 5/9

    सामान हातांनी उचलणे : जड वस्तू उचलताना पायांचा वापर करा, हातांचा नाही. एखादी वस्तू तुमच्या शरीराजवळ ठेवा, तुमच्या पायाचे स्नायू सामान उचलण्यासाठी वापरा, त्यामुळे तुमचा हात आणि पाठीवरचा ताण कमी होईल. (फोटो सौजन्य : @Freepik)

  • 6/9

    श्वास थांबून ठेवणे : जड वस्तू उचलताना तुमचा श्वास रोखून ठेवल्याने पोटाच्या आतील दाब वाढू शकतो आणि तुमच्या मणक्यावर अनावश्यक ताण येऊ शकतो, त्यामुळे नैसर्गिकरित्या श्वास घेत राहावे हे लक्षात ठेवा. (फोटो सौजन्य : @Freepik)

  • 7/9

    मर्यादेकडे दुर्लक्ष करणे : आपण हाताळू शकता त्यापेक्षा जास्त उचलण्याचा प्रयत्न करू नका. एखादी वस्तू खूप जड वाटत असल्यास, मदतीसाठी विचारा किंवा कार्टसारखे सामान उचलण्याचे साधन वापरा. (फोटो सौजन्य : @Freepik)

  • 8/9

    डॉक्टर रेड्डी सांगतात की, जड वस्तू उचलताना योग्य आसनात आपण असणे पाठीच्या हाडांचे संरक्षण करण्यासाठी आणि इजा टाळण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आपल्या पाठीची हाडे न्यूट्रल स्थितीत वजन सहन करण्यासाठी बनली आहेत, पण वाकणे किंवा वळणे यामुळे डिस्क आणि लिगामेंट्सवर अतिरिक्त ताण येतो, ज्यामुळे वेदना, ताण किंवा हर्नियेटेड डिस्क होऊ शकतात.’ (फोटो सौजन्य : @Freepik)

  • 9/9

    जर तुम्हाला पाठीच्या किंवा सांध्याच्या समस्या असतील, तर डॉक्टर रेड्डी जड वस्तू उचलताना अतिरिक्त सावधगिरी बाळगण्याची शिफारस करतात… 1. डॉक्टरांचा सल्ला घ्या : जड वस्तू उचलण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी नेहमी तुमच्या डॉक्टरांशी बोला. ते तुम्हाला जड वस्तू उचलण्याच्या पद्धतींबद्दल सल्ला देऊ शकतात किंवा पर्यायांची शिफारस करू शकतात. 2. लिफ्टिंग एड्स वापरा : तुमच्या शरीरावरील ताण कमी करण्यासाठी गाड्या किंवा लिफ्टिंग स्ट्रॅप्ससारख्या साधनांचा वापर करा. 3. मदतीसाठी विचारा : जड वस्तू उचलताना मदत मागण्यास संकोच करू नका. (फोटो सौजन्य : @Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Common lifting mistakes and how to avoid them read some tips and tricks by the doctor asp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.