-
ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाला वाणी, व्यापार व बुद्धीचा कारक ग्रह मानला जातो. बुधदेखील इतर ग्रहांप्रमाणे त्याच्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सध्या बुध वृश्चिक राशीत स्थित असून तो नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी अस्त झाला आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तसेच तो १३ दिवसांपर्यंत अस्त राहिल. त्यानंतर पुन्हा बुध ग्रह उदित अवस्थेत येईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
पंचांगानुसार, बुध १२ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजून १२ मिनिटांनी उदित होणार असून याचा शुभ प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर पडेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
वृश्चिक राशीत बुध आठव्या आणि अकराव्या घराचा स्वामी असून तो लग्न भावात विराजमान होईल. या काळात तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल आणि गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सिंह राशीच्या व्यक्तींसाठीदेखील बुध ग्रहाचा उदय अत्यंत अनुकूल असेल. या राशीत बुध चौथ्या घरात उदित होईल. या काळात आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तूळ राशीच्या व्यक्तींसाठी बुधाचा उदय खूप लाभदायी सिद्ध होईल. या राशीमध्ये बुध दुसऱ्या भावात उदित होईल. या काळात आकस्मिक धनलाभ होईल. अडकलेली कामे पूर्ण होतील. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
४ दिवसांनंतर नुसता पैसा; बुध ग्रहाचा उदय ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना देणार धनसंपत्तीचे सुख
Budha Gochar 2024: पंचांगानुसार, बुध १२ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजून १२ मिनिटांनी उदित होणार असून याचा शुभ प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर पडेल.
Web Title: Budha gochar 24 happiness of wealth to the persons of these three zodiac signs sap