• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. is it good to eat bhindi in winter read benefits of lady finger or okra ndj

हिवाळ्यात भेंडी खाणे आरोग्यासाठी चांगले आहे का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात

Winter Benefits of Bhindi: खरंच हिवाळ्यात भेंडी आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे का? द इंडियन एक्स्प्रेसनी या विषयी तज्ज्ञांच्या हवाल्याने सविस्तर माहिती जाणून घेतली.

December 26, 2024 14:52 IST
Follow Us
  • is it good to eat bhindi in winter
    1/12

    भारतीय जेवणात भेंडीची भाजी आवडीने खाल्ली जाते. भेंडी ही विविध प्रकारे बनवली जाते. पोळीबरोबर ही भाजी तुम्ही लहानपणापासून खात असाल. सध्या हिवाळा सुरू आहे. हिवाळ्यात भेंडी खाऊ नये, असे तुम्ही कधी वाचले किंवा ऐकले का? (Photo : Freepik)

  • 2/12

    सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये डॉ. पौर्णिमा बहुगुणा यांनी भेंडी हे ‘स्लो पॉयझन’ असल्याचे सांगितले आहे. म्हणजेच थंड वातावरणात भेंडीवर बुरशी साचते आणि त्यापासून सुरक्षित राहण्यासाठी त्यावर कीटकनाशके वापरली जातात, अशी भेंडी आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरते. (Photo : Freepik)

  • 3/12

    द इंडियन एक्स्प्रेसनी या विषयी तज्ज्ञांच्या हवाल्याने सविस्तर माहिती जाणून घेतली.
    बंगळुरू येथील एस्टर व्हाइटफिल्ड हॉस्पिटल येथील मुख्य क्लिनिकल आहारतज्ज्ञ डॉ. वीणा व्ही सांगतात, “हिवाळ्यात भेंडी खाणे वाईट आहे, हे सिद्ध करणारी कोणतीही माहिती किंवा अभ्यास नाही. खरं तर भेंडीमध्ये फायबर, व्हिटामिन्स आणि अँटिऑक्सिडंट्स असतात, जे वर्षभर आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. (Photo : Freepik)

  • 4/12

    डॉ. वीणा पुढे सांगतात, “भेंडीच्या अतिसेवनामुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनलसारखी समस्या उद्भवू शकते, कारण भेंडीमध्ये फ्रॅक्टन्स असतो जो कार्बोहायड्रेटचा एक प्रकार आहे, ज्यामुळे आतड्यांशी संबंधित समस्या असलेल्या लोकांना अतिसार, अॅसिडिटी होऊ शकते. भेंडीमध्ये ऑक्सलेटचे प्रमाणही जास्त असते, ज्यामुळे किडनी स्टोनचा धोका वाढतो.” (Photo : Freepik)

  • 5/12

    पौष्टिक घटक : भेंडीमध्ये फोलेट व्यतिरिक्त व्हिटॅमिन्स ए, सी आणि के या पोषक घटकांचा चांगला स्रोत आहे, ज्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते, दृष्टी सुधारते आणि हाडांचे आरोग्य चांगले राहते. (Photo : Freepik)

  • 6/12

    पचनक्रियेसाठी फायदेशीर : भेंडीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त आहे, जे आतडे निरोगी ठेवण्यास मदत करते आणि पचनक्रिया सुधारते. (Photo : Freepik)

  • रक्तातील साखर नियंत्रित करते : भेंडी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो. तसेच यात विरघळणारे फायबर असतात, जे रक्तातील साखरेचे शोषण कमी करण्यास मदत करतात. (Photo : Freepik)
    हृदयाचे आरोग्य : भेंडीमध्ये विरघळणारे फायबर भरपूर प्रमाणात असते, जे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. (Photo : Freepik)
    अँटिऑक्सिडंट्स : भेंडीमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि पॉलीफेनॉलसारखे अँटिऑक्सिडंट्स असतात जे ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास मदत करतात आणि शरीरातील पेशींचे नुकसान होण्यापासून वाचवतात. (Photo : Freepik)
    त्वचेचे आरोग्य : भेंडीमधील अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी फ्री रॅडिकल्सचा सामना करतात आणि कोलेजन तयार करण्यास मदत करतात, जे निरोगी त्वचा आणि केसांसाठी चांगले आहे. (Photo : Freepik)
    लोह : भेंडीमध्ये व्हिटॅमिन सी असते ते शरीरातील लोहाचे शोषण वाढवतात आणि अशक्तपणा कमी करतात. (Photo : Freepik)
    भेंडी तुम्ही नियमित आहारात अनेक प्रकारे समाविष्ट करू शकता. मसाला भेंडी किंवा कढी भेंडी बनवू शकता. कुरकुरीत स्नॅक म्हणून भेंडी भाजून खाऊ शकता. सूप किंवा मिश्र भाज्यांमध्ये भेंडी टाकून खाऊ शकता. भेंडीचा चिकटपणा दूर करण्यासाठी भेंडी योग्यरित्या शिजवणे आवश्यक आहे. भेंडीबरोबर धान्य किंवा प्रोटिन्सचा समावेश केल्याने तुम्ही संतुलित आहार घेऊ शकता. (Photo : Freepik)
TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्थ न्यूजHealth News

Web Title: Is it good to eat bhindi in winter read benefits of lady finger or okra ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.