-
ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक ग्रह एका निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन किंवा नक्षत्र परिवर्तन करतो. ज्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव १२ राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तसेच या राशी परिवर्तनादरम्यान अनेकदा दोन ग्रह एकाच राशीत युती निर्माण करतात किंवा एकमेकांसमोर येतात. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
येत्या ११ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजून ४१ मिनिटांनी बुध आणि शनीच्या कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तसेच शनीदेखील आधीपासून याच राशीमध्ये विराजमान आहे. ज्यामुळे कुंभ राशीमध्ये या दोन्ही ग्रहांची युती निर्माण होईल. ज्याचा शुभ प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शनी-बुधाची युती मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी सकारात्मक ठरेल. या काळात भौतिक सुखाची प्राप्ती होईल. नवीन कार्य सुरू करण्यासाठी अनुकूल काळ आहे. वैवाहिक जीवन सुखमय असेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम
-
शनी-बुधाची युती सिंह राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुमचा भाग्योदय होईल. मेहनत केलेल्या कामात हवे तसे यश मिळविता येईल. आर्थिक परिस्थिती उत्तम होईल. करिअर आणि व्यवसायात मानासारखे यश प्रस्थापित कराल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तूळ राशीच्या व्यक्तींसाठी शनी-बुधाची युती अत्यंत फायदेशीर ठरेल. या काळात समस्यांपासून सुटका होईल. ताणतणाव दूर होण्यास मदत होईल, मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. आध्यात्माकडे अधिक ओढ राहील. तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीपः वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
फेब्रुवारीपासून शनी-बुध देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना प्रत्येक कामात मिळणार यश
Shani-Mercury Yuti 2025 : ११ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजून ४१ मिनिटांनी बुध आणि शनीच्या कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे.
Web Title: People of these three zodiac signs will get success in every work sap