-
बद्धकोष्ठता ही एक सामान्य गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आजार आहे. या दरम्यान आतड्याची हालचाल कमी होते, आठवड्याभरात तीन वेळासुद्धा तुम्ही शौचास जात नाही, विष्ठा मोठी, कोरडी, घट्ट किंवा गाठीसारखी येते; इत्यादी लक्षणे बद्धकोष्ठतेमध्ये दिसून येते. (Photo : Freepik)
-
सर्व वयोगटातील लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास उद्भवू शकतो. हिवाळ्यात तसेच सणासुदीच्या काळात आपण द्रवपदार्थांचे सेवन कमी करतो, तसेच शारीरिक हालचाल कमी झाल्यामुळे आणि आहारात बदल झाल्यामुळे बद्धकोष्ठतेला सामोरे जावे लागते. (Photo : Freepik)
-
फोर्टिस हॉस्पिटल, मोहाली येथील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि हेपॅटोलॉजीचे संचालक डॉ. अरविंद साहनी आणि फोर्टिस हॉस्पिटल मोहाली येथील क्लिनिकल न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स विभागाच्या प्रमुख डॉ. सोनिया गांधी यांनी बद्धकोष्ठतेवर उपाय सांगितले आहेत, तसेच यावर वैद्यकीय उपचार कसे घ्यावे याविषयी सल्ला दिला आहे. (Photo : Freepik)
-
डॉ. साहनी यांनी आतडे निरोगी ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे, व्यायाम करणे आणि फायबरयुक्त आहार घेण्याचा सल्ला दिला आहे. (Photo : Freepik)
-
हायड्रेशन : दररोज दोन लिटरपेक्षा जास्त द्रवपदार्थ प्या, कारण त्यामुळे अन्नाचे सहज पचन करण्यास मदत होते, आतड्याची हालचाल वाढते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास उद्भवत नाही. (Photo : Freepik)
-
नियमित व्यायाम : आतड्यांसंबंधित हालचाली वाढवण्यासाठी शारीरिक हालचाली करणे आवश्यक आहे. त्यासाठी नियमित व्यायाम करावा. (Photo : Freepik)
-
फायबरचे सेवन : प्रौढांनी नियमित आहारात ३० ग्रॅम फायबरचे सेवन केले पाहिजे. अॅव्होकॅडो, न सोललेले सफरचंद, रास्पबेरी, डाळिंब, ब्रोकोली, कॉर्न, मटार, भोपळा, रताळे इत्यादी फळे आणि भाज्यांचे सेवन करावे. (Photo : Freepik)
-
आहारामध्ये ओट्स, जवस, चिया सीड्स, न सोललेले बटाटे, मसूर आणि सोयाबीन इत्यादींचा समावेश करावा. डॉ. साहनी पूरक आहारांपेक्षा निरोगी आहाराद्वारे फायबरची आवश्यकता पूर्ण करण्याचा सल्ला देतात. (Photo : Freepik)
-
बद्धकोष्ठता, विष्ठेमध्ये रक्त, लक्षणीय वजन कमी होणे, ओटीपोटात दुखणे, उलट्या होणे, भूक न लागणे किंवा पोट दुखत असल्यास वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे. (Photo : Freepik)
-
तात्पुरत्या आरामासाठी डॉ. साहनी सांगतात, “रेचक औधष (Laxative) उपयुक्त ठरू शकते, पण त्याचा वापर अत्यंत सावधपणे आणि फक्त कमी कालावधीसाठी केला पाहिजे. वैद्यकीय मार्गदर्शनाखाली घेतलेली औषधे ही सुरक्षित आणि प्रभावी पर्याय आहेत.” (Photo : Freepik)
-
गांधी सांगतात, “ओट्स, केळी, लसूण आणि कांदे ही प्रीबायोटिक्सचे चांगले पर्याय आहेत, जे आतड्यांमधील बॅक्टेरियाला अन्न पुरवतात. याशिवाय आंबवलेले पदार्थ आतड्यात फायदेशीर बॅक्टेरिया किंवा प्रोबायोटिक्सची संख्या वाढवू शकतात. आंबवलेले पदार्थ जसे डोसा, इडली, लोणचे, ढोकळा इत्यादी. (Photo : Freepik)
-
प्रोबायोटिक्स हे आतड्याचे आरोग्य सुधारणारे बॅक्टेरिया आहेत आणि त्यात दही, चीज इत्यादींचा समावेश होतो. तज्ज्ञ बेरी, ब्रोकोली, नट्स आणि बिया, ब्लूबेरी, चेरी, सफरचंद, स्ट्रॉबेरी, यांसारख्या हंगामी पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला देतात आणि जास्त फॅटयुक्त, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि मिठाई कमी खाण्यास सांगतात. (Photo : Freepik)
Suryakumar Yadav: सूर्याचा घालीन लोटांगण शॉट! मिस्टर ३६० चा फटका पाहून वैभवने दिली भन्नाट रिॲक्शन, पाहा video