-
हिवाळ्यात गोड पदार्थ खाण्याचा एक वेगळा आनंद असतो. हिवाळ्यात मऊ गुलाब जामुनचा आस्वाद घेणे, गरमागरम गाजराचा हलवा खाणे सर्वांना आवडते. हिवाळ्यात गोड पदार्थांना स्वयंपाकघरात एक विशेष स्थान असते. (Photo : Freepik)
-
खरं तर मिठाई जितकी चविष्ट असते, तितकीच ती आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे का, हे जाणून घेणेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. असाच एक गोड, चविष्ट व पौष्टिक पदार्थ म्हणजे तिळाचे लाडू, हिवाळ्यातील तिळाचे लाडू आवडीने खाल्ले जातात. (Photo : Freepik)
-
संतोषी आरोग्यम डाएट ई क्लिनिकच्या आहारतज्ज्ञ अपूर्वा सैनी व जे. पी. हॉस्पिटलच्या बॅरिअॅट्रिक न्यूट्रिशनिस्ट डॉ. साक्षी चोप्रा यांनी हिवाळ्यात तिळाचे भरपूर लाडू का खावेत याची काही कारणे सांगितली आहेत. (Photo : Freepik)
-
सैनी यांच्या मते, वजन कमी करणे म्हणजे उपाशी राहणे नव्हे. तिळाचे लाडू खाल्ल्याने तुम्ही तुमचे वजन सहज कमी करू शकता. कारण- तिळामध्ये फॅट्स कमी करण्याचे गुणधर्म असतात, जे शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात. (Photo : Freepik)
-
तिळाच्या लाडूमध्ये झिंक भरपूर प्रमाणात असते, जे कोलेजन तयार करण्यास प्रोत्साहन देते आणि जे त्वचेला उजळण्यास मदत करते. (Photo : Freepik)
-
मेनोपॉजनंतर (पाळी येणे बंद होणे) महिलांनी तीळ खाणे चांगले आहे. त्यातील फायटोन्यूट्रिएंट्स हार्मोनल असंतुलन नियंत्रित आणि संतुलित ठेवण्यास मदत करतात. (Photo : Freepik)
-
तिळाच्या लाडूमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे कर्करोगापासून सुरक्षित ठेवण्यास मदत करतात आणि शरीरातून फ्री रॅडिकल्स नष्ट करून, रोगप्रतिकार शक्ती वाढवतात. (Photo : Freepik)
-
तिळाच्या लाडूमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतात, जे रक्तातील कोलेस्ट्रॉल सुधारण्यास मदत करतात. त्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत होते. जर तुम्ही निरोगी फॅट्स हवे असेल, तर तिळाचे लाडू अवश्य खा. डॉ. चोप्रा सांगतात की, ज्या महिलांच्या शरीरात लोहाची मात्रा कमी आहे. तसेच, गर्भवती महिला आणि किशोरवयीन मुलींसाठी गूळ घातलेले तिळाचे लाडू खाणे फायदेशीर आहे. (Photo : Freepik)
-
तिळामध्ये तांब्यासारखे सूक्ष्म पोषक घटक असतात; जे संधिवात आणि सांधेदुखीसाठी फायदेशीर असतात. हे पोषक घटक कॅल्शियमने भरलेले आहेत.ऑस्टिओपोरोसिसच्या रुग्णांनी नियमित तिळाचे लाडू खावेत. ऑस्टिओपोरोसिस हा एक हाडांचा आजार आहे. त्यामध्ये हाडे कमकुवत होतात. (Photo : Freepik)
हिवाळ्यात तिळाचे लाडू का खावेत? जाणून घ्या फायदे
Til laddu : संतोषी आरोग्यम डाएट ई क्लिनिकच्या आहारतज्ज्ञ अपूर्वा सैनी व जे. पी. हॉस्पिटलच्या बॅरिअॅट्रिक न्यूट्रिशनिस्ट डॉ. साक्षी चोप्रा यांनी हिवाळ्यात तिळाचे भरपूर लाडू का खावेत याची काही कारणे सांगितली आहेत.
Web Title: Why should we eat til laddu in winter read benefits of tilache ladoos ndj