-
शेअर मार्केट हा अनेकांच्या आवडीचा विषय आहे.अनेक मंडळी शेअर्सद्वारे शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवतात त्यामुळे शेअर माक्रेटमधील छोट्या छोट्या घडामोडींकडे लोकांचे लक्ष असते. शेअर मार्केटमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याविषयी अनेकांना माहिती नसते. (Photo : Freepik)
-
आज आपण अशाच एका महत्त्वाच्या विषयासंदर्भात जाणून घेणार आहोत. तुम्हाला बोनस शेअर म्हणजे काय, माहितीये का? हा बोनस शेअर कोणाला मिळतो? या बोनस शेअर्सचा फायदा काय आहेत, आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. (Photo : Freepik)
-
बोनस शेअर्स म्हणजे शेअर होल्डर्सना कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय दिलेले अतिरिक्त शेअर्स. हे शेअर्स शेअर होल्डर्सच्या मालकीच्या शेअर्सच्या संख्येवर आधारित असतात. हे प्रमाण कंपनी ठरवते. ही कंपनीची साठवलेली कमाई असते, जी शेअर होल्डर्सना काही शेअर विनामोबदला म्हणजे मोफत देते. (Photo : Freepik)
-
कंपनीला आपला व्यवसाय वाढवायचा असतो आणि गुंतवणूकदाराला लाभांश हवा असतो. हा लाभांश दिला तर कंपनी अधिक गुंतवणूक करून व्यवसाय वाढवू शकणार नाही, म्हणून अशा परिस्थितीत कंपनी काही जास्तीचे शेअर विनामोबदला देते. हे जास्तीचे शेअर विकून शेअर होल्डर्स त्यांना हवा तेवढा पैसा घेऊ शकतात. (Photo : Freepik)
-
जे लोक एक्स डेट आणि रेकॉर्ड डेटपूर्वी कंपनीच्या शेअर्सचे मालक आहेत त्यांना बोनस शेअर मिळू शकतात. (Photo : Freepik)
-
भारतात शेअर्स मिळवण्यासाठी T+2 रोलिंग सिस्टम आहे, ज्यामध्ये रेकॉर्ड डेट ही एक्स डेटच्या दोन दिवस मागे असते. (Photo : Freepik)
-
गुंतवणूकदारांना कंपनीचे बोनस शेअर मिळवताना कोणताही टॅक्स भरावा लागत नाही. (Photo : Freepik)
-
बोनस शेअर कंपनीच्या लाँग टर्म शेअर होल्डर्ससाठी फायदेशीर आहे, ज्यांना गुंतवणूक केलेली रक्कम वाढवायची असते. (Photo : Freepik)
-
बोनस शेअर शेअर होल्डर्ससाठी फ्री असतात, कारण हे शेअर्स कंपनीद्वारे जारी केले जातात, ज्यामुळे गुंतवणूकदारांचे कंपनीमध्ये शेअर वाढतात आणि स्टॉकची किंमतसुद्धा वाढते. (Photo : Freepik)
Bonus Share : कोण असतात बोनस शेअरसाठी पात्र? बोनस शेअर्सचा गुंतवणूकदारांना काय फायदा होतो?
Bonus Share : तुम्हाला बोनस शेअर म्हणजे काय, माहितीये का? हा बोनस शेअर कोणाला मिळतो? या बोनस शेअर्सचा फायदा काय आहेत, आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
Web Title: Who is eligible for bonus share and how investors get benefits from bonus shares ndj