Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. do you boil your tea then stop now and read how to make it ndj

तुम्ही चहा उकळून पित असाल तर आजच थांबवा; जाणून घ्या, चहा बनवण्याची योग्य पद्धत

चहा जास्त उकळला तर आणखी चविष्ट वाटतो, असा सर्वसामान्यांचा समज आहे. पण, तुम्हाला माहिती आहे का, उकळलेला चहा आरोग्यासाठी हानिकारक असतो?

January 31, 2025 20:16 IST
Follow Us
  • Boiled tea or Brewed tea
    1/9

    चहा हे सर्वांच्याच आवडीचं पेय. चहा अनेकांना आवडतो. भारतात एक कप चहाने भारतीयांची दिवसाची सुरुवात होते. चहा जास्त उकळला तर आणखी चविष्ट वाटतो, असा सर्वसामान्यांचा समज आहे. (Photo : Freepik)

  • 2/9

    पण, तुम्हाला माहिती आहे का, उकळलेला चहा आरोग्यासाठी हानिकारक असतो? न्यूट्रिशनिस्ट सुमन अग्रवाल यांनी Traya.Health. यांच्याशी संवाद साधताना आपण चुकीच्या पद्धतीने चहाचे सेवन करतो असे सांगितले. त्या म्हणाल्या, “चहा उकळण्याऐवजी ब्रू करून प्यावा.” (Photo : Freepik)

  • 3/9

    आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ब्रू चहा म्हणजे नेमकं काय? ब्रू चहा तयार करताना गरम पाण्यात चहा पत्ती टाकावी आणि तीन मिनिटांमध्ये चहाची चव आणि सुगंध येतो. (Photo : Freepik)

  • 4/9

    सुमन अग्रवाल पुढे सांगतात, “चहा असा पदार्थ आहे, जो सर्व भारतीयांना आवडतो. खूप जास्त उकळलेल्या मसाला चहामध्ये खूप जास्त टॅनिन असते, पण त्याबरोबरच त्यात अनेक हानिकारक घटक असतात. त्यापैकी एक म्हणजे अॅक्रिलामाइड.” (Photo : Freepik)

  • 5/9

    अशा चहाचे दीर्घकाळ सेवन इतके हानिकारक ठरू शकते की कर्करोगाचा धोका उद्भवू शकतो. उकळलेला मसाला चहा शक्यतो टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. चहा उकळून नाही तर ब्रू करून प्यायला पाहिजे. (Photo : Freepik)

  • 6/9

    त्या सांगतात, “गरम पाण्यात चहा पत्ती टाका आणि तीन मिनिटांमध्ये या चहा पावडरची चव गरम पाण्यात उतरते. चहाचे सेवन करण्याचा हा सर्वसामान्य प्रकार आहे.” (Photo : Freepik)

  • 7/9

    खरंच चहा उकळून पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे का?
    बॅलेंस्ड बाइटच्या संस्थापक न्यूट्रिशनिस्ट अपेक्षा चांदूरकर, सांगतात, “चव आणि आरोग्याचे फायदे टिकवून चहा उकळून नाही तर ब्रू करून प्यावा.” (Photo : Freepik)

  • 8/9

    चांदूरकर सांगतात, “चहा ब्रू करणे म्हणजे योग्य तापमानात चहा पावडर गरम पाण्यात उकळू न देता मिक्स करणे होय. कारण जर चहा पावडर पाण्यात उकळून घेतली तर चहा कडू होतो, त्यातील काही रासायनिक घटक नष्ट होतात.”
    चांदूरकर पुढे सांगतात, “मसाला चहा जर खूप जास्त उकळत असाल तर त्याचे दुष्परिणाम दिसून येतात.” (Photo : Freepik)

  • 9/9

    चांदूरकर यांनी चहाचे तापमान सांगितले आहे. काळ्या चहाचे योग्य तापमान सुमारे २००-२१२°F (९३-१००°C) असते, तर कडू चव टाळण्यासाठी ग्रीन टीचे तापमान १६०-१८०°F (७१-८२°C) असावे.
    हर्बल चहा तयार करताना पाणी किती प्रमाणात उकळावे हे प्रकारानुसार अवलंबून आहे. चहाची चव टिकवण्यासाठी चहा पावडर योग्य प्रमाणात टाकणे तितकेच महत्त्वाचे आहे. तुम्ही चहाची चव वाढवण्यासाठी त्यात दूध, साखर आणि लिंबू मिसळू शकता. (Photo : Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleहेल्थHealthहेल्थ न्यूजHealth News

Web Title: Do you boil your tea then stop now and read how to make it ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.