-

ज्योतिषशास्त्रानुसार अनेकदा एका राशीत दोन किंवा त्याहून अधिक ग्रहांची युती निर्माण झाल्याने शुभ किंवा अशुभ संयोग निर्माण होतो. या संयोगाचा विविध प्रभाव मानवी जीवनावर पडतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
येत्या काळात सहा ग्रह एकत्र युती निर्माण करत आहेत. राहू आणि शुक्र मार्चमध्ये मीन राशीत प्रवेश करतील, त्यानंतर २९ मार्च रोजी शनीदेखील या राशीत प्रवेश करेल. तसेच फेब्रुवारीमध्ये बुध ग्रह मीन राशीत प्रवेश करेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
१४ मार्च रोजी सूर्यदेखील त्याच राशीत असेल आणि २८ मार्च रोजी चंद्रदेखील मीन राशीत प्रवेश करेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
या सहा ग्रहांच्या मीन राशीत एकत्र येण्याने काही राशींना धन-संपत्ती आणि मानसन्मान मिळू शकतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सहा ग्रहांची युती मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात नोकरीत हवे तसे यश मिळवाल. मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. या काळात आई-वडील आणि तुमच्या गुरूंचा आर्शीवाद तुमच्या पाठीशी असेल.
-
मकर राशीच्या व्यक्तींसाठी सहा ग्रहांची युती खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरी मिळण्याचे योग आहेत. व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठीही सहा ग्रहांची युती अत्यंत सकारात्मक सिद्ध होईल. त्यामुळे अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आकस्मिक धनलाभ होईल. मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. या काळात आई-वडील आणि तुमच्या गुरूंचा आर्शीवाद तुमच्या पाठीशी असेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
पैसाच पैसा; मार्चमध्ये सहा ग्रहांचा दुर्लभ संयोग; ‘या’ तीन राशींना देणार धन-संपत्ती अन् पद-प्रतिष्ठा
The rare combination of six planets: या सहा ग्रहांच्या मीन राशीत एकत्र येण्याने काही राशींना धन-संपत्ती आणि मानसन्मान मिळू शकतो.
Web Title: Rare combination of six planets in march these three zodiac signs will get the money and prestigious sap