-
ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रहाला धन, संपत्ती, सौंदर्य, भौतिक सुख व आकर्षणाचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शुक्र मजबूत असतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
अशा व्यक्तींना आयुष्यात कधीही कुठलीच आर्थिक चणचण भासत नाही. त्याशिवाय अशा व्यक्तीचे प्रेमसंबंधदेखील उत्तम असतात. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र सध्या मीन राशीत विराजमान असून तो तब्बल ३६० दिवसानंतर म्हणजेच १९ मार्च रोजी मीन राशीमध्ये अस्त होणार आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तसेच ४ दिवस अस्त झाल्यानंतर २३ मार्च रोजी सकाळी ५ वाजून ४९ मिनिटांनंतर तो उदित अवस्थेत येईल. शुक्राच्या मीन राशीतील उदित होण्याने काही राशींच्या व्यक्तींना शुभ परिणाम पाहायला मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
धनु राशीच्या व्यक्तींना शुक्राची उदित अवस्था खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुमच्या प्रत्येक कामात यश मिळेल. या राशीच्या चौथ्या भावात शुक्राचा उदय होईल. आयुष्यात आनंदी आनंद येईल. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मकर राशीच्या व्यक्तींनाही शुक्राची उदित अवस्था खूप फायदेशीर ठरेल. या राशीच्या तिसऱ्या भावात शुक्राचा उदय होईल. या काळात तुमच्या भौतिक सुखात वाढ होईल. समाजात मान-सन्मान वाढेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कुंभ राशीच्या व्यक्तींनाही शुक्राची उदित अवस्था खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. तुमच्या भौतिक सुखात वाढ होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
पैसाच पैसा; ‘या’ तीन राशींना शुक्र देणार प्रेम, प्रमोशनसह भौतिक सुख
Shukra gochar 2025: ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र सध्या मीन राशीत विराजमान असून तो तब्बल ३६० दिवसानंतर म्हणजेच १९ मार्च रोजी मीन राशीमध्ये अस्त होणार आहे.
Web Title: These three zodiac signs will give venus love material happiness with promotion sap